Maharashtra Police | वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या 3 पोलिसांवर उसाच्या फडात हल्ला, मुकादमासह 9 जणांवर FIR

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police | चेक बाउंस प्रकरणात (Check Bounce Case) वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या तीन पोलिसांवर हल्ला (Attack on Police) केल्याची धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यातील (Parbhani Crime) पाथरी तालुक्यात (Pathri Taluka) घडली आहे. वॉरंट (Warrant) बजावण्यास गेलेल्या तीन पोलिसांना हदगाव बु शिवारात बेदम मारहाण (Beating) करत गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना रविवारी (दि.13) रात्री नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी 9 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करुन 5 जांणांना पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. (Maharashtra Police)

 

ऊसतोड मुकादम राजेभाऊ चव्हाण (Rajebhau Chavan) याच्यावर चेक बाउंस प्रकरणात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील (Sangli District) आटपाडी पोलीस ठाण्यातील (Atpadi Police Station) दोन पोलीस कर्मचारी आणि पाथरी पोलीस ठाण्यातील (Pathri Police Station) एक पोलीस कर्मचारी न्यायालयाच्या आदेशानुसार रविवारी रात्री 8 वाजता हदगाव बु येथील शिवारात राजेभाऊ चव्हाण याच्यावर वॉरंट बजावण्यास गेले होते. (Maharashtra Police)

 

यावेळी मुकादम चव्हाण आणि इतर चार जणांनी तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना काठ्यांनी बेदम मारहाण करुन जखमी केले. तसेच पोलिसांच्या गाडीचा पाठलाग करुन शिवीगाळ केली. याबाबत पोलीस कर्मचारी सायद जाफर सायद यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी 9 जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करुन 5 जणांना अटक केली आहे.

 

Web Title :- Maharashtra Police | attack on police in pathari while issuing warrant parbhani crime news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा