Maharashtra Police | धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून पोलिसानेच केला महिलेवर बलात्कार; प्रचंड खळबळ

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police | औरंगाबाद शहरातील एक धक्कादायक घटना (Aurangabad Crime) उघडकीस आली आहे. आपल्या दोन मुलांसह पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेला एका पोलीस कर्मचाऱ्याने (Police Personnel) लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार (Rape in Aurangabad) केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. संदीप लक्ष्मण पवार (Sandeep Laxman Pawar) असं त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. दरम्यान पोलिस कर्मचारी फरार आहे. (Maharashtra Police)

 

याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद शहर पोलीस दलातील (Aurangabad City Police Force) छावणी सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या पथकात कार्यरत असलेल्या संदीप पवारची वर्षभरापूर्वी या महिलेशी ओळख झाली. त्यानंतर त्या कर्मचाऱ्याने तिच्याशी ओळख वाढवली त्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आणि धर्मांतराचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार (Rape) केले. नंतर पीडित महिला गर्भवती राहिली. मात्र आरोपीने महिलेला गर्भपात (Abortion) करण्यास भाग पाडले, नाहीतर तुझ्या मुलांना मारून टाकेल अशी धमकी देखील त्याने दिली. (Maharashtra Police)

दरम्यान, महिलेने आरोपीकडे लग्न करण्यासाठी सतत विचारणाही केली, पण, पोलीस कर्मचाऱ्याने लग्न करण्यास नकार देत महिलेला मारहाणही केली. यानंतर महिलेने सिडको पोलीस ठाण्यात (Cidco Police Station) तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर देखील त्याने लग्न करण्यास नकार दिला. शेवटी महिलेने छावणी पोलीस ठाण्यात (Chavani Police Station) लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनुसार आयपीसी 376, 313, 504, 506 अन्वये गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सध्या आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

 

Web Title :- Maharashtra Police | aurangabad city police man raped a woman on the pretext of marriage crime news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा