Maharashtra Police | संतापजनक ! मुलाला बोलल्याच्या रागातून पोलीस अधिकाऱ्याची राममंदिराच्या पुजाऱ्याला बेदम मारहाण; शहर आणि परिसरात प्रचंड खळबळ

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police | मुलाला बोलल्याचा राग मनात धरुन सहायक पोलीस निरीक्षकाने (API) राममंदिराच्या (Ram mandir) पुजाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार बीड जिल्ह्यात (Beed Crime) घडला आहे. हा प्रकार बीड जिल्ह्यातील (Maharashtra Police) गेवराई तालुक्यात घडाला आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत पोलीस अधिकाऱ्याच्या निलंबनाची (Suspension) मागणी करत चकलांबा पोलीस ठाण्याला (Chaklamba Police Station) घेराव घालत आंदोलन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील (Gevrai taluka) चकलांबा येथील श्रीराम मंदिराचे पुजारी गणपत देशपांडे (Ganpat Deshpande) यांनी सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर पवार (API Digambar Pawar) यांच्या मुलाला मंदिर परिसरात लघुशंका करण्यास मनाई केली होती. याबाबत मुलाने वडिलांना तक्रार केली. दिगंबर पवार यांनी कोणतीही विचारपूस न करता देशपांडे यांना त्यांच्या घरातून बाहेर काढत लाथाबुक्क्यांनी मारहण केली.

या घटनेत पुजारी देशपांडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
स्थानिकांनी या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर पवार यांच्या विरोधात पोलीस ठाण्याला घेराव घातला.
यासंदर्भात बीडच्या पोलीस अधीक्षकांनी (Beed SP) सांगितले की,
या घटनेची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्याची बदली करण्याचे आश्वासन दिले (Maharashtra Police) आहे.

Web Title :- Maharashtra Police | child not allowed to urinate in temple premises police beaten to priest incident in beed district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Foreign Portfolio Investors | FPI नं सप्टेंबरमध्ये केली 26,517 कोटी रुपयांची गुंतवणूक, ‘हे’ होतं आकर्षणाचे कारण

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2,692 नवीन रुग्णांचं निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Starlink | डिसेंबर 2022 पासून भारतात सुरू होईल Elon Musk यांच्या ‘स्टारलिंक’ची सेवा, मिळणार हाय-स्पीड इंटरनेट; जाणून घ्या ब्रॉडबँड सर्व्हिसबद्दल