Maharashtra Police-CID | ICJS मधील ‘पोलीस सर्च’ वर्गवारीत देशपातळीवर महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक; CID मधील PSI अर्चना कदम, पोलिस अंमलदार संदीप शिंदे, प्रियंका शितोळे यांचा गौरव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृह मंत्रालय (Union Home Ministry) व राष्ट्रीय गुन्हे अभिलेख केंद्र नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘Good Practices in CCTNS/ICJS 2021’ कॉन्फरन्स केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा (Ajaykumar Mishra) यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. यावेळी Interoperable Criminal Justice System (ICJS) मधील Police Search या वर्गवारी मध्ये देशपातळीवर महाराष्ट्र (Maharashtra Police-CID) राज्याला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक (Second prize) जाहीर करण्यात आले. तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police-CID) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘वैयक्तीक उत्कृष्ट कामगिरी’बाबत पारितोषीक देण्यात आले.

 

 

महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police-CID) दैनंदिन कामकाजात गुन्हे प्रकटीकरण, गुन्हे प्रतिबंधक कारवाई, पासपोर्ट/चारित्र पडताळणी, वाहनांबाबतची पोलीस रेकॉर्डवरील माहितीची पडताळणी, गुन्हेगारांचा कार्यपद्धी प्रमाणे शोध (MBO), शस्त्र परवाना इत्यादिसाठी CCTNS/ICJS या प्रणालीचा प्रभावीपणे वापर केला. या प्रणालीच्या सहाय्याने महाराष्ट्र पोलिसांनी राज्यातील 1990 गुन्हे उघडकीस आणले आहे. 670 चोरीला गेलेला मुद्देमालाचा शोध घेतला आहे. 1959 हरवलेल्या व बेवारस मयतांचा शोध, 13,848 आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive action) करुन 786 प्रकरणामध्ये जामीन फेटाळले (Bail rejected) आहेत.

 

 

 

महाराष्ट्र पोलिसांनी CCTNS/ICJS या प्रणालीद्वारे 29,803 संशयीत व्यक्ती आणि आरोपींची पडताळणी केली करुन 16,624 जणांवर गुन्हे (FIR) दाखल असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडे दाखल झालेल्या 1 लाख 59 हजार 903 पारपत्र व चारित्र्य प्रकरणांची पडताळणी करण्यात आली असून यामध्ये 3709 जणांवर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या या उल्लेखनीय कामगीरीबद्दल देशपातळीवर दुसरा क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.

 

 

वैयक्तीक उत्कृष्ट कामगिरीबाबत पारितोषीक
CCTNS/ICJS ही प्रणाली राज्यात यशस्वीपणे राबवण्यासाठी उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल गुन्हे अन्वेषण विभागाच्या (crime investigation department – CID) पोलीस उपनिरीक्षक अर्चना कदम (PSI Archana Kadam), पोलीस नाईक संदीप शिंदे (Police Naik Sandeep Shinde), पोलीस नाईक प्रियंका शितोळे (Police Naik Priyanka Shitole) यांना वैयक्तीक उत्कृष्ट कामगिरी केल्याबाबत पारितोषीक देण्यात आले.

 

 

ही कामगिरी अपर पोलीस महासंचालक रितेश कुमार (additional director general of police Ritesh Kumar),
विशेष पोलीस निरीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग मकरंद रानडे (Special Police Inspector State Criminal Investigation Department Makrand Ranade)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक, तांत्रिक सेवा, संगणक विभाग संभाजी कदम (SP Sambhaji Kadam),
अपर पोलीस अधीक्षक नंदा पाराजे (Addi SP Nanda Paraje), पोलीस उपअधीक्षक जितेंद्र कदम (DySP Jitendra Kadam),
चंद्रशेखर सावंत (Chandrasekhar Sawant), अर्चना पाटील (Archana Patil), अरविंद आल्हाट (Arvind Alhat)
तसेच पोलीस निरीक्षक शशीकला काकरे (Police Inspector Shashikala Kakare), जीवन मोहिते (Jeevan Mohite) यांनी ही कामगिरी केली.

 

 

Web Title :- Maharashtra Police-CID | Maharashtra got second prize in the Police Search category of Interoperable Criminal Justice System (ICJS); CID’s PSI Archana Kadam, Policeman Sandeep Shinde, Police Priyanka Shitole get awards NCRB’s 3rd conference-crime investigation department – CID

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

RTE Admission | आरटीई प्रवेशाच्या 24 हजारांहून अधिक जागा रिक्त, पुण्यात 13 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

Pune Crime | पुण्यात MPSC ची तयारी करणार्‍या तरूणीचा प्रियकराकडून ‘पॉश’ हॉटेलमध्ये खून, हत्येचं कारण आलं समोर; आत्महत्या केल्याचा बनाव उघड

Nanar Oil Refinery Project | ‘भाजपचा ‘तो’ नेता 1 नंबरचा दलाल, प्रकल्पासाठी जमिनी हडपल्या, आता पैसे अडकल्यामुळे तडफड’ – खासदार विनायक राऊत