कर्तव्यदक्षतेला सलाम ! ‘खाकी’ वर्दीतील ‘पोलिस’ ठरला ‘देवदूत’, 88 प्रवाशांचे वाचवले ‘प्राण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अलिबागला निघालेली अजंठा कंपनीची प्रवासी बोट मांडवा बंदरात आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास बुडाली. बोटीमध्ये 88 प्रवासी प्रवास करत होते. पोलिसांच्या पेट्रोलिंग करणाऱ्या बोटीने 80 जणांना वाचवले तर अन्य 8 जणांना खासगी बोटीने वाचवण्यात यश आले आहे. मात्र, मांडवा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रशांत घरत यांनी प्रसंगावधान राखत केलेल्या जिगरबाज कामगिरीमुळे 88 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. प्रशांत घरत यांनी सद्गुरू कृपा बोटीतील दोन खलाशांच्या मतदीने ताबडतोबत जाऊन बुडणाऱ्या प्रवाशांना वाचविले. त्यामुळे पोलिसासह दोन खलासी हे प्रवाशांसासाठी देवदूतच ठरले.

मुंबईतील गेटवरून शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास सुटलेल्या बोटीला अपघात झाला. ही बोट मांडवाजवळ बुडायला लागल्याने मोठा गोंधळ उडाला होता. या बोटीमधून 88 प्रवासी प्रवास करत होते. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. पोलीस कर्मचारी आणि कोस्टगार्डच्या मदतीनं सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे. बोट एका बाजुला झुकल्याने बोटीत पाणी घुसले. त्यामुळे प्रवासी घाबरले. सुरुवातीला तिथल्या काही मच्छिमारांना या बोटीवर काहीतरी गडबड झाल्याचे लक्षात आलं.

मांडवा पोलीस उपनिरीक्षक धर्मराज सोनके यांना या अपघाताची माहिती मिलथाच त्यांनी सद्गुरू कृपा बोटीसोबत पोलीस नाईक प्रशांत घरत यांना तात्कळा पाठवून दिले. बोटीच्या खलाशांनी तातडीने जाऊन प्रशांत घरत यांच्यासोबत जाऊन बुडणाऱ्या 88 प्रवाशांचे प्राण वाचवले आणि त्यांना सुखरुप मांडवा बंदरात सोडले. मात्र, पोलिसाने दाखवलेल्या खबरदारीमुळे जलसमाधी मिळणाऱ्या 88 जणांचा जीव वाचला. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. देवदूत बनून आलेल्या पोलीस नाईक प्रशांत घरत आणि खलाशी यांचे कौतुक होत आहे.