कर्जत – आपटा एसटी बसमध्ये IED बॉम्ब आढळल्याने खळबळ

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – रायगडमधील कर्जत आपटा या एस टी बसमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याचे बुधवारी रात्री आढळून आले. पोलिसांनी चार तासाच्या प्रयत्नानंतर हा बॉम्ब निकामी करण्यात यश मिळविले.

हेही वाचा – ‘राजश्री प्रोडक्शन’चे सर्वेसर्वा राजकुमार बडजात्या यांचे निधन

कर्जतहून निघणारी ही एस टी बस आपटा गावात मुक्कामी असते. पेणहून पनवेलकडे येताना आपटा फाट्यावरुन रसायनी कडे जाणाऱ्या रोडवर आपटा गाव आहे. कर्जतहून रात्री ही बस आपटा गावात पोहचली. त्यावेळी बसमध्ये एक वस्तू आढळून आली. तिला वायरी दिसून आल्याने बसचालक व कंडक्टरांनी ही माहिती आगर प्रमुखांना दिली. त्यांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर अलिबाग येथून बॉम्बशोधक व नाशक पथक आपटा गावात दाखल झाले. पोलीस अधीक्षक अनिल पारसकर हे स्वत: रात्री घटनास्थळी आले.

बॉम्ब शोधक व नाशक पथकाने या वस्तूची पाहणी केली. त्यावेळी आपटा गावातील वीजपुरवठा काही काळ बंद करण्यात आला होता. चार तासाच्या प्रयत्नानंतर पहाटे हा बॅमब निकामी करण्यात पोलिसांना यश आले.

ग्रामीण भागात जाणाऱ्या एस टी बसमध्ये अशा प्रकारे बॉम्ब सापडणे ही गंभीर बाब आहे. ही वस्तू कोणी आणली होती आणि तो ती बसमध्ये कधी सोडून गेला याचा तपास रायगड पोलीस करीत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like