Maharashtra Police | ‘ते’ 5 पोलीस संशयाच्या भोवऱ्यात, अंमली पदार्थ प्रकरणी दाखल गुन्ह्याची DCP कडून चौकशी

मिरारोड : पोलीसनामा ऑनलाइन –  Maharashtra Police | मीरारोड पोलिसांनी पकडलेल्या अंमली पदार्थ गुन्ह्यामध्ये (Mira Road Drug Case) गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात मीरारोड पोलीस ठाण्यातील (Mira Road Police Station) 5 पोलीस संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अंमली पदार्थाच्या गुन्ह्याप्रकरणी (Maharashtra Police) परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्तांनी चौकशी (Inquiry) सुरु केली आहे.

मीरारोड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक नितीन जगताप (API Nitin Jagtap),
सतीश निकम (Satish Nikam), संतोष पाटील (Santosh Patil), जाधव (Jadhav) व अतुल गोसावी (Atul Gosavi) यांच्या पथकाने 12 सप्टेंबर रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास पुनम गार्डन मार्गावर युनिक कोरम इमारती जवळ सापळा रचून ही कारवाई केली होती.

आनंद त्रिवेदी (वय-33 रा. समुदरलाल चाळ, रावळपाडा, दहिसर पूर्व) व इम्रान मोहम्मद अंसारी
(वय-38 रा. रश्मीउत्सव, नित्यानंत नगर, मिरारोड हे दोघे त्या ठिकाणी आले असता त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 30 ग्रॅम एमडी (MD) ही अंमली पदार्थाची पावडर सापडली.
याची किंमत 45 हजार रुपये इतकी दाखवण्यात आली होती.
याप्रकरणी सतीश निकम यांनी फिर्याद दिली होती. मात्र, दाखल गुन्ह्यात गैरप्रकार झाल्याची
बाब समोर आल्यानंतर परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त अमित काळे (DCP Amit Kale)
यांनी चौकशी सुरु केली आहे.

 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पाच पोलिसांनी संगनमत करुन अंमली पदार्थांची विक्री
करणाऱ्या एका तस्कराला (Smuggler) हाताशी धरून हा गुन्हा (FIR) नोंद केला होता.
त्या तस्कराला वाचवण्यासाठी अटक करण्यात आलेल्या तस्करांना घटनास्थळी बोलवून घेतले होते.
यामध्ये आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची शक्यता तपासून पाहिली जात आहे.
पोलिसांनी जप्त केलेला एमडी या अमली पदार्थाचा साठा 30 ग्रॅम पेक्षा अधिक असल्याचा संशय आहे.
अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्याची सुपारी घेऊन हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे.

पोलिसांच्या हाती एक क्लिप लागली आहे. तसेच सीसीटीव्ही आणि इतर अन्य बाबी तपासल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
याप्रकरणी पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी एका वृत्तवाहीनीला सांगितले, हा गुन्हा कशा पद्धतीने दाखल झाला व नेमकी काय वस्तुस्थिती होती त्या अनुषंगाने चौकशी सुरु आहे.
चौकशी पूर्ण झाल्यानंतर सर्व स्पष्ट होईल.

 

Web Title : Maharashtra Police | deputy commissioner police inquires drug case miraroad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Kolhapur Crime | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न, पतीला अटक

BMC Recruitment -2021 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्ण संधी, दरमहा 25 हजार पगार; जाणून घ्या सविस्तर

PM Kisan | मोठी खुशखबर ! आता खात्यात येऊ लागतील ‘इतके’ हजार रुपये, जाणून घ्या