Maharashtra Police – DG Medals | DG पोलीस महासंचालक संजय कुमार यांच्या हस्ते पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह विजेत्या डीसीपी स्मार्तना पाटील, एसीपी बजरंग देसाई, रूक्मीणी गलांडे, निवृत्त एसीपी प्रतिभा जोशी, लक्ष्मण बोराटे, व.पो.नि. प्रताप मानकर, वैशाली चांदगुडे यांच्यासह इतर अधिकारी व अंमलदारांचा गौरव

पुणे : Maharashtra Police – DG Medals | पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह सन-२०२० व विशेष सेवा पदक सन-२०२० विजेत्यांना पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य संजय कुमार (IPS Sanjay Kumar) यांच्या हस्ते पोलीस संशोधन केंद्र (CPR Pune) पुणे येथे पदक देवून गौरविण्यात आले. (Maharashtra Police – DG Medals)

यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Jt CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त डॉ.जालिंधर सुपेकर (Addl CP Dr. Jalindar Supekar), पोलिस अधीक्षक पोलिस संशोधन केंद्र ज्योती क्षीरसागर (SP Jyoti Kshirsagar) उपस्थित होते.

सन्मानचिन्ह पदक तसेच विशेष सेवा पदक विजेत्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना शुभेच्छा देवून संजय कुमार म्हणाले, पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून त्यांनी केलेल्या गुणवत्तापूर्वक सेवेबाबत शासनाने दखल घेऊन त्यांना गौरविले आहे. त्यांनी यापुढेही अशीच चांगली सेवा बजावावी. (Maharashtra Police – DG Medals)

 

 

 

पोलीसांनी आनंदात आणि तणाव मुक्त राहून आपले कर्तव्य करणे आवश्यक आहे. पोलीस विभागाने आपल्याला खूप काही दिले आहे. विभागासाठी काम करतांना आपण काय देतो हे खूप महत्त्वाचे आहे. पोलिसांनी आपले कर्तव्य बजावताना चांगले कार्य करून आपल्या विभागाचे नाव नेहमीच उंचावावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी पोलीस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार आणि अपर पोलीस आयुक्त डॉ.जालिंधर सुपेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी २८ पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह -२०२० (पदक) आणि १५ पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना गडचिरोली येथे नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल विशेष सेवा पदक -२०२२ ने गौरविण्यात आले.

पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील (DCP Smartana Patil), सहाय्यक आयुक्त रूक्मीणी गलांडे
(ACP Rukmini Galande), सहाय्यक पोलिस आयुक्त बजरंग देसाई ACP Bajrang Desai
(गडचिरोली येथे नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट सेवा) , निवृत्त सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे,
निवृत्त सहाय्यक आयुक्त प्रतिभा जोशी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर (Sr PI Pratap Mankar),
वरिष्ठ निरीक्षक वैशाली चांदगुडे (Sr PI Vaishali Chandgude), पोलिस उपनिरीक्षक अरविंद चव्हाण
(PSI Arvind Chavan), उपनिरीक्षक अक्षयकुमार गोरड, उपनिरीक्षक शिवदास गायकवाड,
सहाय्यक उपनिरीक्षक दत्तात्रय भोसले, शिवाजी शेळके, राजेंद्र संताजी जगताप, दत्तत्रय शेळके, विजय उत्तम भोर,
प्रदीप शितोळे, सुनिल बबनराव शिंदे, राजकुमार गणपत बारगुने, किरण दत्तात्रय देशमुख, कृष्णा रामभाऊ बडे,
विजय रामदास कदम (गुन्हे शाखा), यशवंत बबन खंदारे, अमोल जयवंत नेवसे,
सुरेंद्र दिलीप जगदाळे (गुन्हे शाखा), मनोज दादासाहेब जाधव, मंगेश निवृत्ती वर्‍हाडे, दिपक शामराव दिवेकर,
हेमलता श्रीकांत घोडके यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह -२०२० (पदक) आणि
पोलिस निरीक्षक स्मिता वासनिक, सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण भुजंगराव देशमुख, पोलिस उपनिरीक्षक खरात,
उपनिरीक्षक रविंद्रकुमार, उपनिरीक्षक विशाल पाटील, उपनिरीक्षक विलास धोत्रे, उपनिरीक्षक विशाल चव्हाण,
उपनिरीक्षक विनय दत्तात्रय जाधव, उपनिरीक्षक अक्षयकुमार गोरड, उपनिरीक्षक जयदीप पाटील यांना
गडचिरोली येथे नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल विशेष सेवा पदक -२०२२ ने गौरविण्यात आले.

Web Title :  Maharashtra Police – DG Medals | DCP Smartana Patil, ACP Bajrang Desai, Rukmini Galande, Retired ACP Pratibha Joshi, Laxman Borate, Sr PI Pratap Mankar, Vaishali Chandgude and other officers and officials are honored DG Medal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंची खुर्ची धोक्यात, न्यायालय मुख्यमंत्रीपद काढून घेऊ शकते? जाणून घ्या सविस्तर

MNS Leader Sandeep Deshpande | राहुल गांधींना इशारा देणाऱ्या उद्धव ठाकरेंना मनसेचा टोला, म्हणाले-‘…की घरी बसून अंडी उबवणार?’