Maharashtra Police | राज्यातील कारागृहातील बंद्यांना शैक्षणिक विशेष माफी, बंद्यांसाठी सुधारणा व पुनर्वसन उपक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police | राज्यातील कारागृहातील (Prison) बंद्यांना शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी (Educational Level) तसेच बंद्यांमध्ये सामाजिक जबाबदारी व उत्तरदायित्व याची जाणीव व्हावी यासाठी कारागृहात अभ्यासकेंद्र (Study Center) व परीक्षा केंद्र (Examination Center) सुरु करण्यात आले आहे. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य (Addl DGP & IG Prisons & Correctional Services, Maharashtra State) यांनी त्यांच्या अधिकारात 3 ऑक्टोबर 2019 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत 89 शिक्षा बंद्यांना 90 दिवसांची विशेष माफी मंजूर (Special Apology) केली आहे. तसेच उपमहानिरीक्षक (Maharashtra Police) यांनी प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Certificate Courses) पूर्ण केलेल्या 6 बंद्यांना 60 दिवसांची विशेष माफी दिली आहे.

राज्यातील कारागृहातील बंद्यांना शैक्षणिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे तसेच जास्तीत जास्त बंद्यांना शैक्षणिक सुविधेचा लाभ घेता यावा तसेच त्यांना सहभाग नोंदवता यावा यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक (Yashwantrao Chavan Open University, Nashik) व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ, दिल्ली (Indira Gandhi Open University, Delhi) यांच्या संयुक्त उपक्रमानुसार कारागृहात 2014 पासून अभ्यासकेंद्र व परीक्षाकेंद्र सुरु करण्यात आले आहे. (Maharashtra Police)

कारागृहातील परीक्षा केंद्रातून 10 वी, 12 वी, पदविका, पदवी, पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध
करुन देण्यात आले आहेत. बंद्यांनी 10 वी. 12वी, बी.ए. बी.कॉम, एम.ए. इत्यादी अभ्यासक्रम पूर्ण करुन
पदवी घेतली आहे. यामुळे कारागृहातून मुक्त झाल्यावर बंद्यांचे सुधारणा व पुनर्वसन होऊन त्यांना चांगले
जीवन जगता येईल. तसेच स्वत:चे आर्थिक उत्पन्न मिळवून स्वत: च्या पायावर उभा राहून स्वत:ची व
कुटुंबीयांची काळजी घेता येईल, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

Web Title :- Maharashtra Police | Educational special amnesty for inmates in state jails, reformation and rehabilitation activities for inmates

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vaalvi 2 | परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांची मोठी घोषणा; ‘वाळवी 2’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Balasaheb Thorat | काँग्रेसचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर; काँग्रेसनेते बाळासाहेब थोरांत यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा?

Kasba Constituency Bypolls | जाणून घ्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचे शिक्षण आणि संपत्ती