Maharashtra Police | पोलिसावर तलवारीने हल्ला, पोलीस निरीक्षकांचा आरोपीवर गोळीबार

नांदेड :  पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police |  नांदेड शहर आज (शुक्रवार) पुन्हा एकदा गोळीबाराच्या (Firing) घटनेने हादरुन गेले. व्यावसायिक संजय बियाणी (Builder Sanjay Biyani) यांची गोळ्या घालून हत्या (Murder In Nanded) केल्याची घटना ताजी असतानाच आज रात्री साडे सातच्या सुमारास नांदेड ग्रामीण हद्दीत (Nanded Gramin) आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर आरोपीने तलवारीने हल्ला (Sword Attack On Police Squad) केला. त्यामुळे बचावसाठी (Nanded Crime) पोलिसांनी आरोपीच्या मांडीवर गोळी झाडली. आरोपी आणि जखमी पोलीस यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Maharashtra Police)

मंगळवारी नांदेड शहरात बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची घरासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर नाकाबंदी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच ज्यांच्यावर देशी कट्ट्यांचे (Pistol) गुन्हे (FIR) दाखल आहेत, त्यांची झाडाझडती सुरु आहे. त्यातच नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड (Police Inspector Ashok Ghorband) हे पथकासह वसरणी भागात (Vasrani Area)  पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी सराईत गुन्हेगार संजूसिंग बावरी (Sanju Singh Bawri) हा साईबाबा मंदिर (Sai Baba Temple) परिसरात असल्याची माहिती मिळाली. (Maharashtra Police)

मिळाळेल्या माहितीच्या आधारे पथक त्या ठिकाणी पोहचले. आरोपीने माझ्याकडे कशाला आला असे म्हणून शिवा पाटील (Shiva Patil) या कर्मचाऱ्यावर तलवारीने हल्ला केला. यात पाटील जखमी झाले. इतरही कर्मचाऱ्यांच्या अंगावर तो तलवार घेऊन धावत होता. त्यावेळी पोलीस निरीक्षक घोरबांड यांनी आरोपीच्या मांडीवर गोळी घालून त्याला बेड्या ठोकल्या.

Web Title : Maharashtra Police | firing in nanded sword attack on police accused was shot by police nanded crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ तर, चांदी वधारली; जाणून घ्या लेटेस्ट रेट

 

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रात उभारले जाणार सौरऊर्जा पार्क

 

Digital-Social Media Training Camp Pune | आगामी निवडणुकीत ‘डिजिटल कार्यकर्त्यां’मुळे मिळेल नवसंजीवनी; रविवारी पुण्यात डिजिटल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर