अभिमानास्पद ! महाराष्ट्र पोलीस दलाला मिळाली ‘ही’ मानाची दोन पारितोषिके

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवी दिल्ली येथे अखिल भारतीय पोलीस प्रमुख संवाद संमेलन (आॅल इंडिया हेड्स आॅफ पोलीस कम्युनिकेशन काॅन्फरन्स) पार पडली. या संमेलनात काही पारितोषिकांचे वाटप करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे यात महाराष्ट्र पोलीस दलाला सर्वात मानाची असलेली दोन पारितोषिके जाहीर झाली आहेत. या संमेलनात राज्याचे बिनतारी संदेश (वायरलेस) विभागाचे संचालक व अतिरिक्त पोलीस महासंचालक रितेश कुमार हे उपस्थित होते. इतकेच नाही तर महाराष्ट्र पोलीस दलाला जाहीर झालेली ही सर्वात मानाची असलेली दोन पारितोषिके रितेश कुमार यांनी स्विकारली.

नवी दिल्ली विज्ञानभवन येथे दि. 19 व 20 नोव्हेंबर रोजी पोलीस दलाच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमात महाराष्ट्र पोलीस दलाला 2 पारितोषिके जाहीर झाली. महाराष्ट्र पोलीस हे देशात उच्च तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करत असल्याबद्दल प्रथमच गोपनीयता राखण्यासाठी यातील पहिले पारितोषिक तर सुरक्षित तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल दुसरे पारितोषिक देण्यात आले. सदर दोन्ही पारितोषिके रितेशकुमार यांनी केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांच्या हस्ते स्वीकारली.

सदर दोन्हीही पारितोषिके ही सर्वात मानाची असल्याचे मानले जाते. मुख्य म्हणजे सदर पारितोषिके ही महाराष्ट्र पोलीस दलाला प्रदान होणे म्हणजे ही एक अभिमानाचीच बाब आहे.

.संमेलन