Maharashtra Police | पोलिस कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! PSI होण्याची सुवर्णसंधी, 250 पदांसाठी भरती होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police | महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार (Police Constable), पोलीस नाईक (Police Naik) आणि पोलीस शिपाई पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक (Police Sub-Inspector) होण्याची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलात 250 पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासांठी 30 जुलै रोजी परीक्षा होणार आहेत. पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा -2021 चे (Divisional Competition Main Exam-2021) आयोजन करण्यात आले आहे.

 

या परीक्षेसाठी बुधवार (दि.15) पासून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 29 जून 2022 असून ही परीक्षा राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये होणार आहे. यामध्ये पुणे (Pune), नाशिक (Nashik), नागपूर (Nagpur), मुंबई (Mumba), अमरावती (Amravati), औरंगाबाद (Aurangabad) या सहा केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे इच्छूक अर्जदारांना अर्ज दाखल करताना एकाच परीक्षा केंद्राची निवड करावी लागणार आहे.
परीक्षा शुल्क ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने भरता येणार आहे. (Maharashtra Police)

 

अर्जदाराने अर्ज भरताना जे जिल्हा केंद्र (District Center) निवडले आहे तेच अंतिम राहणार आहे.
जिल्हा केंद्र बदलीबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही.
त्यामुळे अर्ज दाखल करताना सोयीचे ठिकाण निवडावे. सर्वसाधारण गटातील कमाल वयोमर्यादा 35 वर्षे असून मागासवर्गीय उमेदवारासाठी 40 वर्षे आहे.
मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित 300 गुणांची असणार आहे. शारीरिक चाचणीसाठी 100 गुण असतील.
अधिक माहितीसाठी https://mpsc.gov.in/ वेबसाईटवर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Web Title :- Maharashtra Police | golden opportunity for state police personnel to become police sub inspector psi will be recruitment for 250 posts

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | कंपनीतून अ‍ॅल्युमिनियमच्या प्लेटा चोरणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेकडून अटक

 

Pune Crime | फॅशन स्ट्रीट परिसरात व्यापाऱ्यावर गोळीबार करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेकडून अटक

 

Maha Phone Tapping Case | फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई पोलिस नवाब मलिकांचा जबाब नोंदवणार, न्यायालयाची परवानगी