Maharashtra Police | राज्य सरकारची नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील भागातील पोलिसांना गुड न्यूज, वेतनात घसघसीत वाढ अन् महागाई भत्ता मिळणार

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police | राज्य सरकारने महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नैमित्तिक रजा (Casual Leave) 12 वरुन 20 करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता नक्षलग्रस्त (Naxalite) गडचिरोली (Gadchiroli), अहेरी (Aheri) तसेच गोंदिया जिल्ह्यातील (Gondia District) अतिसंवेदनशील क्षेत्रात (Sensitive Area) कर्यरत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या वेतनाच्या (Salary) दीडपट दराने आणि महागाई भत्ता (Dearness Allowance) मिळणार आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने सोमवारी (दि.3) हा निर्णय घेतला आहे.

 

नशलग्रस्त किंवा अतिसंवेदनशील क्षेत्रात कर्तव्य बजावणे हे खूप मोठे जोखमीचे आहे. प्रत्येक क्षणाला पोलिसांना आपला जीव मुठीत धरून कायदा व सुव्यस्था (Law and Order) सांभाळावी लागते. पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना नक्षलग्रस्त भागात कधी आपला जीव देखील गमवावा लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारने (State Government) विशेष बाब म्हणून पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना (Maharashtra Police) वेतनात घसघसीत वाढ केली आहे.

 

यामध्ये गडचिरोली, अहेरी नक्षलग्रस्त आणि गोंदिया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रत्येक पोलीस अधिकारी (Police Officer), कर्मचाऱ्यांना (Employees) वाढीव वेतन, महागाई भत्त्याचा (DA) लाभ मिळणार आहे. याशिवाय या भागात कार्यरत असलेल्या राज्य गुप्तवार्ता विभागाचे (State Intelligence Department) अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेतनाच्या दीटपट दराने वेतन आणि महागाई भत्ता मिळणार असल्याचे, गृह विभागाचे सचिव संजय खेडेकर (Secretary Sanjay Khedekar) यांनी स्पष्ट केले.

या अधिकारी, कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार नाही
राज्य राखीव पोलीस दलाच्या (State Reserve Police Force) तुकड्या नक्षलग्रस्त गडचिरोली,
अहेरी आणि गोंदिया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील क्षेत्रात कार्यरत असतात.
राज्य सरकारच्या नवीन निर्णयानुसार राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) तुकड्यांनी कर्तव्य बजावलेल्या कालावधीतील वेतन, महागाई भत्ता दीडपट दिला जाणार आहे.
परंतु, या भागात सामान्य प्रशासनाकडून नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना ही नियमावली लागून असणार नाही,
असेही शासन आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे.

 

Web Title :- Maharashtra Police | good news for police in naxalite and sensitive areas before dussehra one and a half times salary and dearness allowance will be given

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ramraje Naik Nimbalkar | गोरें हे काय देशातील पक्षाचे मालक झालेत का? आ. रामराजेंचा आ. गोरेंना टोला

Shivendra Raje Bhosale | आपली कॉलर आपल्या मानेवरच चांगली दिसते शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला

MNS On Shivsena | मनसेची शिवसेनेवर टीका, शिवतीर्थावरच्या टोमणे मेळाव्यासाठी मांडवली झाली म्हणे… मी तुझ्याकडे, तू माझ्याकडे गर्दी कर