×
Homeताज्या बातम्याMaharashtra Police Havaldar Suspended | दलालांशी हातमिळवणी ! पोलिस हवालदार बडतर्फ, गुप्तचर...

Maharashtra Police Havaldar Suspended | दलालांशी हातमिळवणी ! पोलिस हवालदार बडतर्फ, गुप्तचर विभागाचे 2 अधिकारीही प्रकरणात सहभागी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police Havaldar Suspended | मानवी तस्करी करणाऱ्या दलालांशी हातमिळवणी करून तब्बल 43 लोकांना बेकायदेशीरपणे परदेशात पाठवण्यास मदत करणाऱ्या मुंबई पोलीस (Mumbai Police) हवालदाराची हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. तसेच गुप्तचर विभागाचे (Intelligence Bureau) दोन अधिकारीही या रॅकेटमध्ये सामील असल्याची माहिती मिळत आहे. (Maharashtra Police Havaldar Suspended)

मिळालेल्या माहितीनुसार, हवालदार संजय थोरात यांची 2017 मध्ये इमिग्रेशन आणि पासपोर्ट क्लिअरन्सची देखरेख करणाऱ्या विशेष शाखा II मध्ये नियुक्ती झाली होती. मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्यांशी हातमिळवणी करून किमान 43 लोकांना बनावट पासपोर्ट वापरून परदेशात पाठविले. त्यांच्यावर हे आरोप झाल्यानंतर पाच वर्षे त्यांची चौकशी झाली.

या चौकशीनंतर दोषी आढळल्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले. आता, 25 नोव्हेंबर रोजी थोरात यांना कार्यमुक्तीचा आदेश जारी करण्यात आले आहेत.
पोलिसांनी सांगितले की, थोरात याने मानवी तस्करी करणाऱ्या दलालांशी हातमिळवणी केली होती. 2017 मध्ये बनावट आणि फसवणूक उघडकीस आल्यानंतर सहार पोलीस ठाण्यात (Sahar Police Station) भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर तपासात गुप्तचर विभागाचे दोन अधिकारीही या प्रकरणात सहभागी असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

Web Title :-Maharashtra Police Havaldar Suspended | dismissal of mumbai police havaldar who helped send people abroad illegally

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kraigg Braithwaite | क्रेग ब्रेथवेटने ऑस्ट्रेलियात केला विक्रम! अशी कामगिरी करणारा वेस्ट इंडीजचा तिसरा कर्णधार

Aamir Khan | आमिर खानच्या आयुष्यातील ‘तो’ प्रसंग सांगताना त्याला आश्रू अनावर; व्हिडिओ व्हायरल

Must Read
Related News