Maharashtra Police Inspector (PI) Suspended | न्यायाधीशांशी केलेले गैरवर्तन भोवले! वादग्रस्त पोलिस निरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन, ज्या ठाण्यात प्रभारी तेथेच FIR

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police Inspector (PI) Suspended | चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांना निवडणुकीच्या दरम्यान मारहाण केल्याप्रकरणी चर्चेत आणि वादाच्या भोवऱ्यात आलेले चामोर्शी ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे (Police Inspector Rajesh Khandve) यांना न्यायाधीशांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. ज्या पोलिस स्टेशनमध्ये त्यांनी इनचार्ज अधिकारी म्हणून काम केले, त्याच ठाण्यात त्यांच्यावर FIR करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. (
Maharashtra Police Inspector (PI) Suspended)

चामोर्शी बाजार समिती निवडणुकी दरम्यान अतुल गण्यारपवार यांना पोलिस ठाण्यात पहाटे ठाण्यात बोलावून मारहाण केल्याचा आरोप गण्यारपवार यांनी पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर केला होता.

दरम्यान, पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्याविरुद्ध चामोर्शीत आंदोलन झाले होते.

त्यानंतर गण्यारपवारांनी चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात धाव घेतली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.डी. मेश्राम यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत 20 मे रोजी पीआय राजेश खांडवेंवर IPC कलम 294, 324, 326, 342 अन्वये गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले.

25 मे रोजी सकाळी पीआय खांडवे हे न्यायाधीश मेश्राम यांच्या घरी गेले. गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यावरुन खांडवे यांनी न्यायाधीश मेश्राम यांच्याशी वाद घालून गैरवर्तन केले.

 

न्यायाधीश मेश्राम यांनी ही बाब पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना सांगितली.
चामोर्शी पोलिस स्टेशनचा तात्पुरता चार्ज उपनिरीक्षक सुधीर साठे यांच्याकडे सोपविला आहे.

 

Web Title :  Maharashtra Police Inspector (PI) Suspended | The abuse of the judge! Controversial police inspector’s hasty suspension, FIR filed in the station where he is in charge

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा