ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सज्ज

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात मतदान संपल्यानंतर ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने नियोजन केले आहे. ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी राज्यातील पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. ईव्हीएम मशीनसंदर्भात निवडणूक आयोगाचे विशिष्ट निर्देश असून राज्य पोलीस प्रशासन त्याचे तंतोतंत पालन करेल, असे मत पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी व्यक्त केले आहे.

निवडणूक आणि त्यानंतर ईव्हीएमची सुरक्षा करताना आम्ही दक्ष राहू, शांततापूर्ण वातावरणात निवडणुका होणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. यावेळी देखील कोणताही अनुचित प्रकार होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) पोलीस महासंचालकांनी नागपूर आणि अमरावती भागातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना आवश्यक सूचनाही केल्या. राज्यात चार टप्प्यांमध्ये निवडणुका होत असल्यामुळे पोलिसांना कोणत्याही क्षणी मदतीसाठी हालचाली करणे सोपे जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पुलवामामधील घटनेनंतर पोलीस फोर्स दक्ष राहणे गरजेचे असून महाराष्ट्र पोलीस दक्ष आहेत. सर्व युनिट कमांडर्सला तशा सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या काही आठवड्यांत मुंबईमध्ये 2 ठिकाणी स्फोटके आढळली आहेत, परंतु अद्याप त्या दोन्ही घटनांचा दहशतवादाशी काहीही संबंध आढळलेला नाही. अशी माहिती पोलीस महासंचालकांनी दिली. यापूर्वीही महाराष्ट्रात आणि मुंबईत अनेक दशतवादी कारवाया झाल्या आहेत. परंतु आता तशा कारवाया थांबवण्याची आमची क्षमता खूप वाढली आहे. आमचं intelligence network आणि
intelligence gathering mechanism अनेक पटींनी सुधारले असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.

ह्याहि बातम्या वाचा-

तुमच्या पवार साहेबांनी ‘यांना’ कळा सोसून जन्माला घातले का ? ; ‘या’ नेत्याचे वक्तव्य

सुजय विखे Is in trending पण…

‘ते गांधी सत्याच्या मार्गावर चालायचे हे गांधी खोट्याच्या मार्गावर चालतात’

शरद पवार यांचे नातू रोहित पवारांचा पार्थ अजित पवारांना सल्ला काय दिला सल्ला हे वाचा सविस्तर

मुलाचे हट्ट वडिलांनी पुरवायचे असतात : शरद पवार