Maharashtra Police | 20 हजाराची लाच घेताना महिला पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचारी एअ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, पोलिस निरीक्षकाची तडकाफडकी बदली; प्रचंड खळबळ

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police| पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 376 च्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी 20 हजाराची लाच घेताना (Accepting Bribe) महिला सहायक पोलीस निरीक्षक प्रणिता पवार (API Pranita Pawar) आणि पोलीस नाईक तुषार बैरागी (Police Naik Tushar Bairagi) यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Nashik) सलग दुसऱ्या दिवशी कारवाई करुन दोन पोलिसांना लाच घेताना पकडल्याने नाशिक पोलीस (Nashik Police) दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. आज झालेल्या कारवाईमुळे नाशिक पोलिसांना झालंय तरी काय? असा प्रश्न विचारण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. (Maharashtra Police)

 

नाशिक शहरातील महत्त्वाचे मानले समजले जाणारे भद्रकाली पोलीस ठाण्यातील (Bhadrakali Police Station) एका महिला पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस नाईकास लाच घेताना पकडले. सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस नाईक यांना नाशिक एसीबीने (Nashik ACB) पडकल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार समोर येताच पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (CP Jayant Naikanvare) हे अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख (Senior Police Inspector Irfan Shaikh) यांची तडकाफडकी बदली (Transfer) केली आहे. (Maharashtra Police)

 

भद्रकाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक प्रणिता पवार यांनी तक्रारदार यांच्याविरोधात दाखल असलेल्या 376 सह इतर गुन्ह्याचा तपासात मदत करण्यासाठी तसेच कोर्टात चार्जशीट (Chargesheet) लवकर पाठवण्यासाठी 20 हजार रुपये लाच मागितली. पवार यांनी लाचेची मागणी 13 मे रोजी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Nashik ACB) तक्रार केली. दरम्यान, आज (बुधवार) लाचेची रक्कम निश्चित करण्यासाठी आले होते.

 

विशेष म्हणजे काल (मंगळवार) आडगाव पोलीस ठाण्यात (Adgaon Police Station) 20 हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या पोलिसांना अटक (Arrest) केली होती. त्यामुळे सलग दोन दिवसात दोन एसीबीच्या कारवाया झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या लाच प्रकरणाला 24 तास होत नाही तोच भद्रकाली पोलीस ठाण्यातील दोन पोलीस एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत.

Web Title :- Maharashtra Police | Lady Police officer (API) and one police caught by acb while accepting bribe in nashik

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे यांची पुण्यातील सभा रद्द, जाणून घ्या कारण

Pune PMC News | माजी नगरसेवकांकडून महापालिकेच्या मिळकतींचा बेकायदेशीररित्या ‘भाडेतत्वावर’ वापर सुरू ! प्रशासन ऍक्शन मोडवर; एका प्रकरणात गुन्हा तर दुसर्‍या प्रकरणात हॉल सील करण्याचे आदेश

Black And Green Grapes | काळे की हिरवे, कोणती द्राक्षे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहेत? जाणून घ्या खाण्याची योग्य वेळ