Maharashtra Police | पोलीस उपनिरीक्षकाची (PSI) गळफास घेऊन आत्महत्या, वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police | अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे पोलीस उपनरिक्षक विजय अडोकर (PSI Vijay Adokar) यांनी गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केली (Committed Suicide). ही घटना आज (बुधवार) सकाळी उघडकीस आली आहे. वरिष्ठांच्या जाचाला (Harassment) कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप विजय यांच्या वडिलांनी केला आहे. तसेच दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर (Guilty Police Officers) कारवाई करण्याची मागणी त्यांनी (Amravati Crime) केली आहे. (Maharashtra Police)

 

मृत विजय अडोकर यांना पॅरालिसीसचा (Paralysis) आजार होता. बदलीसाठी त्यांनी वारंवार वरिष्ठांकडे अर्ज केले होते. मात्र, वरिष्ठांनी त्यांच्या अर्जाला केराची टोपली दाखवली होती. त्यामुळे दोषींवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा अडोकर यांच्या कुटुंबीयांनी घेतला. वलगाव पोलीस ठाण्याचे (Valgaon Police Station) पोलीस निरीक्षक यांनी तुम्हाला निलंबित (Suspended) का करु नये, अशी नोटीस दिल्याचा आरोप विजय अडोकर यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. (Maharashtra Police)

काय आहे प्रकरण ?
पोलीस उपनिरीक्षक विजय अडोकर हे मागील काही दिवसांपासून आजारी होते.
त्यांच्यावर अमरावती येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. पॅरालिसीस या आजाराने ते त्रस्त झाले होते.
त्यामुळे त्यांनी बदलीसाठी (Transfer) अर्ज केला होता. परंतु त्यांच्या अर्जाचा विचार केला गेला नाही. उलट वरिष्ठ जाच करत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

 

वरिष्ठांकडून सहानुभूती ऐवजी छळ
विजय अडोकर यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
बापाला मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.
आता घरचा तरुण पोरगा निघून गेल्याने कुणासाठी जगायचं असा प्रश्न विजय यांचे वडील विचारत आहेत. वरिष्ठांनी आजारी कर्मचाऱ्याला सहानुभूती देण्याऐवजी छळ केला.
यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचं वडिलांच म्हणण आहे. त्यामुळे वरिष्ठांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

Web Title :- Maharashtra Police | Maharashtra amravati police sub inspector hangs himself family members accuse amravati police sub inspector of strangulation

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा