Maharashtra Police | पोलिस प्रशिक्षण केंद्रातील 29 पोलिसांना जेवणातून विषबाधा, सर्वांची प्रकृती स्थिर

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police | शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी (Dhule Police Training Center) पोलिसांना शुक्रवारी रात्रीच्या जेवणानंतर अचानक त्रास होऊ लागला. त्यांची प्रकृती बिघडत असल्याचे लक्षात येताच, 29 जणांना तातडीने रुग्णवाहिकेने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले (Food Poisoning). त्यांच्यावर उपचार सुरू झाल्याने त्यांची प्रकृती स्थिर आहे. कुणालाही काहीही अधिकचा त्रास नसल्याची माहिती पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाटील (SP Pravinkumar Patil) यांनी दिली. (Maharashtra Police)

 

File photo

नव्याने पोलीस दलात येणाऱ्या पोलीस (Maharashtra Police) विद्यार्थ्यांना धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्या निवासासह जेवणाची सोयदेखील याच ठिकाणी करण्यात येते. दुपार आणि रात्रीचे जेवण त्यांना वेळेवर दिले जाते. शुक्रवारी रात्रीचे जेवणानंतर सुरुवातीचा काही वेळ कुणाला काही त्रास जाणवला नाही पण, क्षणार्धात एका पाठोपाठ एक याप्रमाणे जेवण केलेल्या 29 प्रशिक्षणार्थींना उलट्याचा त्रास सुरू झाला. ही बाब गांभीर्याने घेत त्यांना तातडीने रुग्णवाहिकेने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांना जेवणातून किंवा पाण्यातून ही विषबाधा झाली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र वेळीच उपचार मिळाल्याने सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

Web Title : Maharashtra Police | Maharashtra Dhule Police Training Center Food Poisoning SP Pravinkumar Patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ तर, चांदी वधारली; जाणून घ्या लेटेस्ट रेट

 

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रात उभारले जाणार सौरऊर्जा पार्क

 

Digital-Social Media Training Camp Pune | आगामी निवडणुकीत ‘डिजिटल कार्यकर्त्यां’मुळे मिळेल नवसंजीवनी; रविवारी पुण्यात डिजिटल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर