Maharashtra Police | राज्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना आता 12 तासांऐवजी 8 तास ड्युटी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police | महाराष्ट्रातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी (Female Police Personnel) एक महत्वाची आणि आनंदाची माहिती समोर (Maharashtra Police) आली आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यांना आता 12 तासांऐवजी 8 तास ड्युटी असणार आहे. सरकारने त्यांच्या ड्युटीचे तास कमी केले आहेत. यापुर्वी महिला आणि पुरूष पोलीस कर्मचाऱ्यांना 12 तास ड्युटी करावी लागत होती. परंतु, आता महिला पोलीस कर्मचाऱ्यांना केवळ 8 तासच ड्युटी असणार आहे. त्यामुळे महिला पोलिसांना एक दिलासा मिळाला आहे.

 

महाराष्ट्रात महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आता 12 तासांऐवजी 8 तास ड्युटी होणार आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठीचा हा नवीन निर्णय प्रायोगिक पातळीवर लागू करण्यात येणार आहे. याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांच्या वतीने आदेश जारी करण्यात आले आहे. (Maharashtra Police)

 

महिला कर्मचाऱ्यांसाठी 8 तास ड्युटी ही पुढील आदेश येईपर्यंत लागू असणार आहे.
असं गुरुवारी पोलीस महासंचालकांनी दिलेल्या आदेशात सांगितलं आहे.
तसेच, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, महिला अधिकाऱ्यांना काम आणि
वैयक्तिक जीवनात चांगला समतोल साधता यावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
यापूर्वी हा निर्णय नागपूर शहर, अमरावती शहर आणि पुणे ग्रामीणमध्ये लागू करण्यात आला आहे.

 

दरम्यान, आपत्कालीन स्थितीत अथवा सणासुदीच्या काळात महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास वाढवले जाऊ शकतात.
मात्र, ते केवळ संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) किंवा पोलीस उपायुक्तांच्या (DCP) परवानगीने करता येऊ शकते. असं देखील सांगण्यात आलं आहे.

 

Web Title :- Maharashtra Police | maharashtra police reduced working hours of women police personnel from 12 hours to 8 hours

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा