Maharashtra Police | ठाकरे सरकारचा निर्णय ! मुंबईत पोलिसांना मिळणार 50 लाखांमध्ये घर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police | राज्यातील ठाकरे सरकारने (Thackeray Government) एक मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील वरळी बीडीडी चाळमध्ये (Worli BDD Chaal Police Quarters) पोलिसांना (Maharashtra Police) घर देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, पोलिसांना 50 लाख रुपयांमध्ये घरे घेता येणार आहे. आजच्या झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Maharashtra State Cabinet Meeting) याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

 

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या माहितीनुसार, ”आज वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाबाबत चर्चा झाली. या बीडीडी चाळीत सध्या तिथं क्वाटर्स मध्ये (Worli BDD Chaal Police Quarters) राहत असलेल्या पोलिसांना 50 लाख रूपयांना घरे दिली जातील. 2250 पोलीस कुटुंबीय तिथे राहत असून माणुसकीच्या भावनेतून त्यांचा विचार करण्यात आला आहे,” अस ते म्हणाले. (Maharashtra Police)

 

पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले, ”या बीडीडी चाळीत पोलिसांना 500 चौरस फुटांची घरे दिली जातील. ज्याचा वरळीत बांधकाम खर्च एक कोटी 5 लाख इतका आहे. त्यामुळे फुकटात अजिबात घरे दिली जाणार नाहीत. गिरणी कामगार आणि पोलीस यांची तुलना होऊ शकत नाही. तसेच, ‘मुळात ती पोलीस क्वाटर्स आहेत. त्यांचा यावर काहीही हक्क नाही. असं प्रत्येक ठिकाणी झाले तर पोलिसांना मुंबईत राहण्यासाठी क्वार्टर्स मिळणार नाहीत. हा धोरणात्मक निर्णय नाही, वरळीपुरता हा निर्णय आहे. फुकटात घर देणार नाही. त्यांचा मालकी हक्क नाही, सरकारने मोठ्या मनाने घरं देतंय. 50 लाख किंमत द्यावीच लागणार असल्याचं,” ते म्हणाले.

Web Title :-  Maharashtra Police | maharashtra police to get 50 lakh houses in mumbai announces-by jitendra awhad thackeray government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Tamannaah Bhatia Red Carpet Pics | कांसच्या रेड कार्पेटवर तमन्ना भाटियानं दाखवली सौंदर्यांची जादू, पाहा व्हायरल फोटो…

Shikhar Dhawan Bollywood Entry | क्रिकेट नंतर बॉलिवूडमध्ये पहायला मिळणार गब्बरचा जलवा

Post Office Business Idea | पोस्ट ऑफिसची बेस्ट स्कीम ! फक्त 5 हजार गुंतवा अन् घरीच करा व्यवसाय; होईल लाखोंची कमाई

Sugar Level And Cholesterol | बीएमआयच्या मदतीने साखरेची पातळी आणि कोलेस्ट्रॉलची पातळी दीर्घकाळापर्यंत निरोगी राहू शकते; जाणून घ्या

Mouni Roy Glamorous Look | मौनी रॉयनं बोल्ड ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली परफेक्ट फिगर, व्हायरल फोटो पाहून नेटकरी म्हणाले, ‘Gorgeous..’