Maharashtra Police | दुर्दैवी ! ट्रॅक्टर कारच्या अपघातात दोघा पोलिसांचा जागीच मृत्यू; 2 पोलीस गंभीर जखमी

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police | भरधाव जाणार्‍या कारने पुढे असलेल्या ऊसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात दोघा पोलिसांचा (Maharashtra Police) जागीच मृत्यु झाला तर, दोन पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. (Nanded Accident News)

 

 

दीपक जाधव (Policeman Deepak Jadhav) आणि ईश्वर राठोड (Policeman Ishwar Rathod) अशी ठार झालेल्या पोलिसांची नावे आहेत. प्रितेश इटगाळकर आणि सदानंद सपकाळ अशी गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचार्‍यांची (Policeman Injured) नावे आहेत. दोघांही जखमी पोलिसांवर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. हा अपघात नांदेड जिल्ह्यातील भोकर – नांदेड रोडवरील खरबी शिवारात घडला.

 

 

दीपक जाधव व इतर चार पोलीस हे कारने जात होते. अंधारात पुढे जाणार्‍या ट्रॅक्टर ट्रॉलीचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे कारने ऊसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून जोरात धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यु झाला. (Maharashtra Police)

 

 

भीषण अपघातात 2 पोलिसांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी धाव घेतली होती.

 

Web Title :- Maharashtra Police | nanded tractor trolley hits car two police officers dies on the spot accident news marathwada

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा