Maharashtra Police News | महाराष्ट्रातील 3 पोलीसांना राष्ट्रपती यांच्या हस्ते ‘शौर्य पुरस्कार’ प्रदान; IPS सोमय मुंडे यांच्यासह तिघांचा समावेश

नवी दिल्ली : Maharashtra Police News | पोलीस सेवेत अदम्य साहसाचा परीचय देणाऱ्या महाराष्ट्रातील तीन पोलीसांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या हस्ते ‘शौर्य पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. (Maharashtra Police News)

राष्ट्रपती भवन येथील दरबार सभागृहात आज ‘शौर्य पुरस्कार’ वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रपती यांच्या हस्ते याप्रसंगी शौर्य पुरस्कार आणि किर्ती चक्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग अन्य कॅबिनेट मंत्री उपस्थित होते.

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील भारतीय पोलीस सेवेचे (आयपीएस) सोमय मुंडे (IPS Somay Munde) ,
पोल‍ीस नाईक टीकाराम काटेंगे आणि पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र नेताम यांना नक्षलवाद्यांच्या विरोधात केलेल्या कार्यवाहीसाठी ‘शौर्य पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

आज झालेल्या कार्यक्रमात 29 शौर्य पुरस्कार आणि 8 क‍िर्ती चक्र प्रदान करण्यात आले. यामध्ये पाच मरणोपरांत पुरस्कारांचा समावेश आहे

Web Title :-  Maharashtra Police News | 3 policemen from Maharashtra were given ‘Shaurya Awards’ by the President; Including three including IPS Somay Munde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar | एकनाथ शिंदेंच्या कर्नाटकातील प्रचारावरुन शरद पवारांचा टोला, म्हणाले – ‘केंद्रातून जो…’

Prithviraj Chavan | ‘मी बरंच सहन केलंय, शरद पवार…’, पवारांच्या खोचक टीकेला पृथ्वीराज चव्हाणांचे प्रत्युत्तर

Pune PMC Property Tax News | आता मिळकत कर थकबाकीदारांकडे महापालिकेचा मोर्चा ! मोठ्या थकबाकीदारांच्या मिळकती सील करणार, चेंज ऑफ युज केलेल्यांची व्यावसायीकांची आकारणी करणार