Maharashtra Police News | सहाय्यक पोलिस निरीक्षकासह 5 पोलिस निलंबित

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police News | गृहमंत्री दिलिप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्यासह अन्य बडे नेते सातारा (Satara News) जिल्ह्यावर असतानाच पहाटे औंध पोलीस ठाण्याचे (Aundh Police Station Satara) लॉकअप तोडून पाच अट्टल दरोडेखोर पळाले. या घटनेने परिसरासह जिल्हा हादरुन गेला. ही घटना 9 मे रोजी घडली. दरम्यान चौहबाजूनी पोलिसांच्या जबाबदारीबाबत प्रतिक्रिया उमटत असतानाच आता सातारा पोलिस प्रमुख (Satara Police) अ‍ॅक्शन मोडमध्ये आले. त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षकासह (API) 5 पोलिस कर्मचार्‍यांना निलंबित (Suspended) केले आहे. (Maharashtra Police News)

 

पळून गेलेल्या 5 दरोडेखोर प्रकरणी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल (SP Ajay Kumar Bansal) यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षकासह (API) 5 पोलिस कर्मचार्‍यांना निलंबित केलं आहे. त्यांची आता प्राथमिक चौकशी करण्यात येणार असल्याचं सागितलं आहे. (Maharashtra Police News)

दरम्यान, 8 व 9 मे रोजी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह अनेक मंत्री जिल्ह्या दौर्‍यावर होते.
यावेळी पोलिसांनी अलर्ट असणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. याचाच गैरफायदा घेत दरोडेखोरांनी लॉकअप तोडून पळ काढला.
यानंतर पोलिसांवर सवाल उठू लागले. तसेच पोलिस अधीक्षकांनी कामचुकार करणार्‍यांवर कारवाई करावी अशीही मागणीही होत होती.
त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी कारवाईचा बडगा उगारत पाच जणांना निलंबित केले आहे.

 

सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे (API Prashant Badhe) यांना निलंबित करण्यात आलं आहे.
त्यांच्या जागेवर आता सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे (API Dattatraya Darade)
यांना प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

 

Web Title :- Maharashtra Police News | 5 policemen suspended including assistant police inspector maharashtra satara Aundh Police Station IPS Ajay Kumar Bansal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा