Maharashtra Police News | पोलीस उपनिरीक्षकाला जीवे मारण्याची धमकी; कुख्यात गुन्हेगार अखेर गजाआड

भुसावळ : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police News | भुसावळ शहरातील श्रीराम नगर (Shriram Nagar) परिसरात असलेल्या हनुमान मंदिराजवळ टोळीची दहशत कायम ठेवण्याच्या हेतून पोलीस रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार (Criminal) आणि करणी सेनेचा खान्देश अध्यक्ष (Karni Sena Khandesh President) निखिल राजपूत (Nikhil Rajput) व त्याच्या टोळीन एका पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला (Attack On PSI ) करुन जीवे मारण्याची धमकी (Threat) दिली होती. हा प्रकार 27 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री साडे बाराच्या सुमारास घडला होता. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड (PSI Mahesh Ghayatad) यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात (Bazarpeth police station) फिर्याद दिली होती. गुन्हा (FIR) दाखल झाल्यानंतर निखिल राजपूत हा फरार (Bhusawal Crime) झाला होता. (Maharashtra Police News)

 

पोलिसांनी निखिल राजपूतसह 8 जणांच्या टोळीविरोधात गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला. मात्र आरोपी निखिल पोलिसांना सापडत नव्हता. दरम्यान, निखील राजपूत हा श्रीरामनगर येथील त्याच्या घरी आल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपी निखिल याला आज (सोमवार) सकाळी अटक (Arrest) केली. त्यानंतर त्याची धिंड काढून त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. (Maharashtra Police News)

काय आहे घटना?
भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक महेश भास्कर घायतड हे हद्दीत पेट्रोलिंग करत होते. रात्री साडेबाराच्या सुमारास श्रीराम नगर परिसरात असलेल्या हनुमान मंदिराजवळ निखिल राजपूत, अक्षय न्हावकर उर्फ थापा, गोलू कोल्हे, नकुल राजपूत, आकाश पाटील अभिषेक शर्मा, निलेश ठाकूर आणि आणखी एक अज्ञात व्यक्तीने महेश घायतड यांच्यावर हल्ला केला. घायतड यांचा गळादाबून त्यांना मारहाण (Beating) करुन शिवीगाळ केली. तसेच सरकारी कामात अडथळा आणला.

 

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते. यातील चौघांना वांजोळा रोड (Wanjola Road) परिसरातून अटक करण्यात आली होती. मात्र या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार निखिल राजपूत हा फरार होता. अखेर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

Web Title :- Maharashtra Police News | Death threat to police sub-inspector; The notorious criminals finally arrested by Bazarpeth police station of Bhusawal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sara Sachin Tendulkar | …म्हणून सारा तेंडुलकर झाली भलतीच खुश; इंस्टाग्रामवर पोस्ट केला ‘हा’ फोटो, झाला क्षणात ‘व्हायरल’

 

Sugarcane Juice Benefits | चवीला उत्कृष्ट असण्यासह आरोग्यासाठी सुद्धा चांगला असतो उसाचा रस, जाणून घ्या असंख्य फायदे

 

Old And New Tax Slabs | कामाची बातमी ! जुन्या आणि नवीन टॅक्स स्लॅबची अशी करा निवड, नवीन व्यवस्थेत यांना मिळू शकतो फायदा