Maharashtra Police News | पोलीस कर्मचाऱ्याने स्वत: वरच गोळी झाडून केली आत्महत्या, सुसाईड नोट आढळली; प्रचंड खळबळ

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police News | जिल्ह्यातील किल्लारी (Killari) येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील पोलीस ठाण्यातील (Killari Police Station) एका कर्मचाऱ्याने रविवारी पहाटे स्वत: वरच गोळी झाडून आत्महत्या केली. या प्रकारामुळे लातूर जिल्हा पोलीस दलात (Latur Police Force) खळबळ उडाली आहे. साहेबराव सावंत (Sahebrao Sawant) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. (Maharashtra Police News)

 

याबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे (SP Nikhil Pingle) म्हणाले की, साहेबराव सावंत हे किल्लारी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. २०१७ ते २०१८ दरम्यान त्यांनी काही जणांना पैसे दिले होते. मात्र ते पैसे त्यांना परत मिळत नव्हते. त्यामळे ते तणावात होते. त्यातूनच त्यांनी रायफलीने स्वत: वर गोळी झाडून घेतली अशी माहिती समोर येत असल्याचे पिंगळे यांनी सांगितले. (Maharashtra Police News)

 

दरम्यान, साहेबराव सावंत यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली आहे अशी माहिती समोर येऊ लागली आहे. त्या चिठ्ठीत काही जणांची नावे आहेत. पोलिसांनी आता या चिठ्ठीच्या आधारे तपास सुरू केला आहे. नक्की आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे देखील स्पष्ट होणार आहे.

 

Web Title :- Maharashtra Police News | due to financial stress Killari policeman shot suicide in killari latur police force

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा