Maharashtra Police News | पोलीस आयुक्त, अधीक्षक कार्यालयांच्या आस्थापनांवरील 68 अस्थायी पदांना ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police News | राज्याचे पोलीस महासंचालक (DGP Maharashtra) यांच्या अधिपत्याखालील पोलीस आयुक्त (Commissioner Of Police) व पोलीस अधीक्षक (Superintendent Of Police) आणि इतर कार्यालयांच्या आस्थापनांवरील एकूण ६८ अस्थायी पदांना १ मार्च ते ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत मुदतवाढ (Extension) देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे. (Maharashtra Police News)

 

या शासन निर्णयानुसार आस्थापनांवरील मानसेवी बालरोगतज्ज्ञ यांची ४८ पदे आणि इतर वेगवेगळ्या संवर्गातील २० पदे अशा एकूण ६८ अस्थायी पदांना ही मुदतवाढ देण्यात आली आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून या पदांना मुदतवाढ देण्याबाबत शासनाला विनंती करण्यात आली होती. (Maharashtra Police News)

या अस्थायी पदांना अटी व शर्तींच्या अधीन राहून शासनाने मुदतवाढ दिली असून या अटींनुसार ही मुदतवाढ सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी रिक्त असलेल्या पदांना लागू राहणार नाही. ही ६८ पदे ज्या अटी व शर्तींच्या अधीन मंजूर करण्यात आली आहेत, त्यांचे काटेकोरपणे अनुपालन करण्यात यावे. पोलीस महासंचालकांनी सर्व पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंध शासनाच्या मान्यतेसाठी तात्काळ सादर करावा. यानंतर आकृतीबंध निश्चित करण्याकरिता या पदांची मुदत वाढवून मिळणार नाही, असेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

 

Web Title :  Maharashtra Police News | Extension of 68 temporary posts in establishments of
Police Commissioner, Superintendent offices till August

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा