Maharashtra Police News | पोलीस उपनिरीक्षकासह (PSI) हवालदारावर FIR, पोलीस दलात खळबळ

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police News | तीन वर्षापूर्वी मारहाणीत मनोरुग्णाचा मृत्यू झाल्या प्रकरणी (Psychiatrist Death Case) नागपूर पोलीस दलातील (Nagpur Police) पोलीस उपनिरीक्षक (PSI) आणि पोलीस हवालदार (Police Constable) यांच्या विरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. सप्टेंबर 2019 मधील हे प्रकरण आहे. एका मनोरुग्णाला बांधून केलेल्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेल्या प्रकरणाची सीआयडी चौकशी (CID Inquiry) करण्यात (Nagpur Crime) आली. (Maharashtra Police News)

 

याप्रकरणी सक्करदरा पोलीस ठाण्यात (Sakkardara Police Station) गुरुवारी (दि.9) तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अजित पांडुरंग सिद (PSI Ajit Pandurang Sid) तसेच पोलीस हवालदार कैलास दोमादार (Kailash Domadar) सह अन्य कर्मचाऱ्यांविरुद्ध मेंटल हेल्थ केअर अ‍ॅक्ट (Mental Healthcare Act) 2017 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीआयडी चौकशी दोषी आढळून आल्यानंतर सीआयडी पोलीस अधीक्षक सुरेंद्र धुमाळे (CID Superintendent of Police Surendra Dhumale) याच्या तक्रारीनंतर सिद आणि दोमादार सह मेहरास सर्फुद्दीन शेख (Mehras Sarfuddin Sheikh), युसुफ हसन खान (Yusuf Hassan Khan), अनवर हुसैन जिगरी भाई (Anwar Hussain Jigri Bhai) तसेच दर्ग्यात राहणाऱ्या एका अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra Police News)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बलरामपूर जिल्ह्यातील (Balrampur District) उत्तरला येथील जैल्या गजपूर येथील फैजान अहमद नसीब अली Faizan Ahmed Naseeb Ali (वय-36) याचा मारहाणीत मृत्यू झाला होता. फैजान मनोरुग्ण असतानाही आरोपींनी त्याचे हातपाय बांधून त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत फैजान गंभीर जखमी झाला. मात्र आरोपींनी त्याला रुग्णालयात नेले नाही. अखेर जखमी फैजानचा मृत्यू झाला. त्यावेळी हे प्रकरण राज्यात खूप गाजले होते.

 

Web Title :- Maharashtra Police News | filed a case against the constable along with the police sub inspector nagpur crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rajya Sabha Elections 2022 | राज्यसभा निवडणूक ! 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात, आज फैसला

 

Gold Silver Price Today | सोन्यात तेजी तर चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

 

Petrol-Diesel Price Today | कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ; पेट्रोल-डिझेलचा दर वाढणार?

 

Pune MHADA Lottery 2022 | पुण्यात म्हाडाकडून तब्बल 5 हजार घरांची सोडत; जाणून घ्या सोडत कधी निघणार अन् अर्ज प्रक्रिया