Maharashtra Police News | दुर्देवी ! जेवताना श्वसन नलिकेत अन्न अडकल्याने पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यू

नालासोपारा : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police News | नालासोपारा पोलीस ठाण्यातील (Nalasopara Police Station) पोलीस कर्मचार्‍याचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याने पोलीस दलात (Maharashtra Police News) खळबळ उडाली आहे. कर्मचार्‍याच्या मृत्यूमुळे पोलिसांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही दुर्दैवी घटना रविवारी रात्री घडली आहे. महेंद्र मस्के (वय, 34) असं या पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे.

अधिक माहितीनुसार, महेंद्र मस्के (Mahendra Muske) हे पूर्वी वसई कोर्टात (vasai court) काम करत होते. रविवारी रात्री पोलीस कर्मचारी, न्यायालयातील कोर्ट कारकून, शिपाई मित्रांबरोबर सर्व मिळून कामण येथील हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. जेवताना श्वसन नलिकेमध्ये अन्न अडकल्याने श्वास घेण्यास त्रास झाल्याने दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे तात्काळ डॉक्टरांनी तपासण्या करून ऑक्सिजन लावला, मात्र उपचारादरम्यान कर्मचार्‍याचा मृत्यू झाला.

या दरम्यान, रात्री त्याचा मृतदेह रिद्धिविनायक हॉस्पिटलच्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला.
सोमवारी (26 जुलै) सकाळी शवविच्छेदन करण्यासाठी जेजे हॉस्पिटलमध्ये मृतदेह पाठवून जळगाव (Jalgaon) येथील मूळ गावी त्यांचे अंतिम संस्कार होणार आहेत.
त्यांच्या पश्चात दोन लहान मुली, पत्नी असा परिवार आहे.
शांत, सदैव हसरा आणि मनमिळावू स्वभावाचा महेंद्र मस्के (Mahendra Muske) यांच्या अचानक जाण्यामुळे पोलीस ठाण्यातील पोलिसांना दुःख अनावर झालं आहे.

Web Title :- Maharashtra Police News | policeman dies after food gets stuck respiratory tract while eating

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik Crime | दोघा भावांवर सपासप वार करत जीवघेणा हल्ला; नाशिक शहरातील खळबळजनक घटना, Video व्हायरल

Pune Crime | 58 गुंठे जमीन बळकवण्यासाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याच्या धमकीच्या गुन्ह्यातील संशयित नितीन हमनेचा जामीन मंजूर

Energy Policies | शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा, ‘हे’ 4 देश करतील जगाचा विध्वंस; महाविनाश रोखण्यासाठी घ्यावी लागेल ‘अ‍ॅक्शन’