Maharashtra Police | आता सह आयुक्त, अपर पोलीस आयुक्तांनाही नाईट ड्युटी ! पोलीस आयुक्तही करणार ‘नाईट ड्युटी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police | पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी नवीन आदेश जारी (New Order Issued ) केले आहे. आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही ‘नाईट ड्युटी’ करावी लागणार आहे. मुंबई पोलीस दलाच्या (Mumbai Police) इतिहासात पहिल्यांदाच असा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस दलाचे पोलीस आयुक्त संजय पांडे (CP Sanjay Pandey) यांनी हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ते स्वत: देखील नाईट ड्युटी (Night duty) करणार आहेत. (Maharashtra Police)

पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी घेतलेल्या निर्णया नुसार, मुंबई पोलीस दलातील कनिष्ठ अधिकारी (Junior Officer), कर्मचाऱ्यांप्रमाणे (Employees) आता सह आयुक्त (Joint CP), अपर पोलीस आयुक्त (Addl CP) या वरिष्ठ अधिकाऱ्यांनादेखील नाईट ड्युटी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा देखील शहरात रात्रीचा जागता पहारा असणार आहे. (Maharashtra Police)

मुंबई शहरात (Mumbai City) दिवसाप्रमाणेच रात्रीच्या वेळेसदेखील तगडा पहारा असणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळेस कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचा नाईट राऊंड शहरात असतो. ACP, DCP त्या त्या प्रादेशिक विभागांमध्ये रात्रीची गस्त घालून पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामाचे पर्यवेक्षण (Supervision) करत असतात. महत्त्वाच्या ठिकाणी भेटी, लॉकअप चेकअप करतात. मात्र, आता पोलीस आयुक्तांनी यामध्ये बदल केला आहे.

दिवसाप्रमाणे रात्रीचा पहारादेखील अधिक कडक केला आहे. आयुक्तांनी स्वत: महिन्यातून एकदा रात्रपाळी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सह आयुक्त, अपर पोलीस आयुक्त यांना देखील नाईट ड्युटी लावली आहे. वरिष्ठ अधिकारीच रात्रीचे इन अॅक्शन राहिले आणि प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवले तर पोलीस दल अधिक सक्षमपणे नाइट ड्युटी करतील आणि अंधारात चालणाऱ्या नको त्या कामांचा बंदोबस्त होईल. तसेच एखादी घडना घडल्यास तात्काळ योग्य निर्णय घेऊन पुढील कार्यवाही करणे शक्य होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सह आयुक्त 15 दिवसांतून एकदा, अपर पोलीस आयुक्त 10 दिवसांतून एकदा तर पोलीस उपायुक्त आणि सहायक पोलीस आयुक्त सात दिवसांतून किमान एकदा नाईट ड्युटी करतील असा आदेश संजय पांडे यांनी काढला आहे. मध्यरात्री 12 ते पहाटे 4 या वेळेत सह आयुक्त, अपर आयुक्तांना संपूर्ण मुंबईत तर उपायुक्तांना प्रादेशिक विभागात रात्रीची गस्त घालून शहरावर लक्ष ठेवावे लागेल. तसेच मुख्य नियंत्रण कक्षाकडून (Control Room) माहिती मिळेल तशी विशेष मोहीम (Special Campaign) राबवावी लागणार आहे.

web title : Maharashtra Police | Now joint commissioner additional commissioner
of police on night duty decision commissioner of police mumbai CP Sanjay Pandey

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा