Maharashtra Police | महाराष्ट्र पोलिसांच्या बाबतीत ‘कही खुशी कही गम’, वित्त विभागाने घेतला मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police) पोलीस कर्मचाऱ्यांना सार्वजनिक शासकीय वाहतुकीच्या (Public Transport) माध्यमातून प्रवासासाठी पोलीस विभागाकडून विशेष सोय केली होती. मात्र आता वित्त विभागाने (Finance Department) घेतलेल्या निर्णयामुळे पोलिसांचा निशुल्क प्रवास बंद झाला आहे. पोलिसांच्या (Maharashtra Police) प्रवासासाठी पोलीस कर्मचाऱ्यांच्या खात्यातून महिन्याच्या शेवटी 2700 रुपये प्रत्येकी तर अधिकाऱ्यांच्या खात्यातून 5400 रुपये वजा करुन ते सार्वजनिक वाहतुकीसाठी दिले जात होते.

 

या सुविधेमुळे पोलीस अधिकाऱ्यांना सार्वजनिक शासकीय गाड्यांमधून विना तिकीट प्रवास करता येत होता. मात्र, यामुळे जे कर्मचारी आणि अधिकारी बेस्ट (BEST) किंवा परिवहन विभागाच्या बसने प्रवास करत नव्हते त्यांच्याही खात्यातून पैसे कापले जात असल्याने याचा फटका या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बसत होता.

निशुल्क प्रवास बंद
आता वित्त विभागाने मोठा निर्णय घेतला असून या निर्णयानुसार पोलिसांचा (Maharashtra Police) निशुल्क प्रवास बंद करण्यात आला आहे. ज्या पोलिसांना बसेस किंवा बेस्टचा वापर करायचा आहे. अशा पोलिसांनी तिकीट काढून प्रवास करावा असा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक शासकीय वाहतुकीच्या नावाखाली पोलीस कर्मचाऱ्यांच्या खात्यातून 2700 तर अधिकाऱ्यांऱ्यांच्या खात्यातून 5400 रुपये वजा केले जात होते ते आता कापले जाणार नाहीत. त्यामुळे पोलिसांना हा खूप मोठा दिलासा आहे.

 

बेस्टला सर्वात मोठा फटका
वित्त विभागाने घेतलेल्या या निर्णयाचा सर्वात मोठा फटका बेस्टला बसला आहे.
बेस्टला मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) वतीने महिन्याला एक लाख रुपये मिळत होते.
मात्र आता पोलिसांचा निशुल्क प्रवास बंद केल्याने बेस्टला हे पैसे मिळणार नाहीत.
त्यामुळे अगोदर तोट्यात असलेल्या बेस्टला आणखी फटका बसणार आहे.

 

Web Title :- Maharashtra Police | now maharashtra police gets travel allowance TA News

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा