Maharashtra Police Officer Transfers | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 19 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या ! पोलिस उपायुक्त (DCP), अप्पर पोलिस अधीक्षक (Addl SP), उपविभागीय अधिकारी (SDPO) / सहाय्यक पोलिस आयुक्तांचा (ACP) समावेश; जाणून घ्या यादी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police Officer Transfers | लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दिलातील 19 पोलीस उपायुक्त (DCP) व सहायक पोलीस आयुक्तांच्या (ACP) बदल्या करण्यात आल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्या सूचना व निर्देशांनुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी मृणाल कृष्णा सावंत यांनी राज्यपालांच्या आदेशाने काढले आहेत.(Maharashtra Police Officer Transfers)

बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव कंसात कोठून कोठे

 1. विवेक गोपाळ पाटील (पोलीस उपायुक्त, पिंपरी चिंचवड ते पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक)
 2. शशिकांत बोराटे (पोलीस उपायुक्त, पुणे शहर ते पोलीस उपायुक्त, ठाणे शहर)
 3. गणेश गावडे (पोलीस उपायुक्त, ठाणे शहर ते पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई)
 4. नवनाथ ढवळे (पोलीस उपायुक्त, ठाणे शहर ते पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई)
 5. सचिन पांडुरंग गोरे (पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक ते पोलीस उपायुक्त, ठाणे शहर)
 6. राजु धोंडीराम मोरे (सहायक पोलीस आयुक्त, सोलापूर शहर ते सहायक पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड)
 7. मसूदखान मेहबूब खान (सहायक पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर ते पोलीस उपअधीक्षक मुख्यालय बुलढाणा)
 8. साईनाथ रामराव ठोंबरे (सहायक पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर ते सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर)
 9. किशोर रामदास खैरनार (सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर ते सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई)
 10. अनिल वसंतराव देशमुख (सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर ते सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई)
 11. वसंत वामन कुंवर (सहायक पोलीस आयुक्त पुणे शहर ते पोलीस अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अहमदनगर)
 12. विठ्ठल खंडुजी कुबडे (सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड ते सहायक पोलीस आयुक्त, सोलापूर शहर)
 13. विवेक वसंतराव मुगळीकर (सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड ते उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीवर्धन, जि. रायगड)
 14. जयेश मुरलीधर भांडारकर (सहायक पोलीस आयुक्त, नागपूर शहर ते पोलीस उप अधीक्षक मुख्यालय, वर्धा)
 15. पूनम संभाजी पाटील (सहायक पोलीस आयुक्त, अमरावती शहर ते पोलीस उप अधीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला)
 16. संदीप बाबुराव मिटके (पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, अहमदनगर ते सहायक पोलीस आयुक्त, नाशिक शहर)
 17. संतोष शिवाजी वाळके (पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, बीड ते उपविभागीय पोलीस अधिकारी, लोहमार्ग उपविभाग, अकोला)
 18. पुंडलिक नामदेवराव भटकर (पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण ते पोलीस उप अधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, वर्धा)
 19. प्रमोद मयाराम मडामे (उपविभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा उपविभाग, जि. गोंदिया ते उपविभागीय पोलीस अधिकारी, आमगाव जि. गोंदिया)

Maharashtra State Excise Department | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ! अवैध दारूसह सुमारे 2 कोटी 82 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त