अभिमानास्पद ! API सुभाष पुजारी ठरले ‘मास्टर भारत श्री 2021’

पनवेल : पोलीसनामा ऑनलाईन – इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशन यांचे वतीने घेतलेल्या 11 व्या मेन्स ज्युनिअर, मास्टर ,दिव्यांग, वुमेन ज्युनिअर, ज्युनिअर नॅशनल बॉडीबिल्डिंग चॅम्पीयन शीप-2021 स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी मास्टर भारत श्री 2021 किताब पटकावला आहे. यामुळे पुजारीनी स्वतःसह महाराष्ट्र पोलिसांचे नाव देशपातळीवर अभिमानाने फडकाविले आहे. हा किताब पटकावणारे पुजारी हे देशातील पहिलेच पोलीस अधिकारी ठरले आहेत.

पंजाबमधील लुधियाना येथे दि. 20 ते 21 मार्च दरम्यान ही स्पर्धा झाली. मास्टर भारत श्री 2021 खेळताना 80 किलो वजनी गटात सुभाष पुजारी यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. महाराष्ट्र पोलीसासाठी ही बाब मान उंचावणारी आहे. त्यांच्या यशाबददल पोलीस खात्यात एक मानाचा तुरा रोवला आहे. आता दि. 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान मालदीव येथे होणाऱ्या आंतराष्ट्रीय स्पर्धेसाठी पुजारी भारतचे नेतृत्व करणार आहेत. राष्ट्रीय मास्टर एशिया श्री 2021 या बॉडीबिल्डिंग स्पर्धेमध्ये त्यांची निवड भरतीय संघातून झाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष शंकर पुजारी हे महामार्ग पोलीस मदत केंद्र पळस्पे येथे कार्यरत आहेत.