Coronavirus : 24 तासात 55 पोलीस ‘कोरोना’ पॉझिटिव्ह,बाधितांचा आकडा 4103 वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4.25 लाखा पेक्षा अधिक झाली आहे. तर 13699 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र पोलीस रात्रंदिवस कर्तव्य पार पाडत असताना पोलिसांवर कोरोना संकट अधिक गडद झालं आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे.

राज्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 55 पोलिसांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 4 हजार 103 इतकी झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 48 झाली आहे. तर 3039 पोलिसांना कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर काही पोलिसांनी ड्युटी जॉईन केली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात आणि मुंबईत कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. आता पावसाळा सुरू झाल्याने सरकारची चिंता अधिक वाढली आहे. त्यासाठी महापालिकेने (बिएमसी) एक Rapid Action Plan तयार केला आहे. पावसाळ्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता असून त्यासाठी तयारी सुरु केल्याची माहिती मुंबई महापालिकचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like