पुणे : वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या (PI) बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे शहर पोलीस दलातील २२ वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत़. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना व निकषांनुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत़. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गणेशोत्सव काळातील बंदोबस्त व विसर्जन मिरवणुक अशा महत्वाचे सण असताना प्रथमच अशाप्रकारे बदल्या करण्यात आल्या आहेत़. याशिवाय ज्यांचा जिल्हा पुणे आहे व मागील ४ वर्षांपूर्वी ३ वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे असे १८ पोलीस उपनिरीक्षक तसेच ८ परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक यांच्या शहरांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत़

बदल्या झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक, निरीक्षक (कंसात जुने ठिकाण) : प्रकाश खांडेकर (वारजे) वाहतूक शाखा, अशोक कदम (स्वारगेट) वारजे माळवाडी, कृष्णा इंदलकर (चंदननगर) वाहतूक शाखा, राम राजमाने (शिवाजीनगर) विश्रामबाग, शिवाजी शिंदे (हडपसर) कोथरुड, विष्णु पवार (भारती विद्यापीठ) वाहतूक शाखा, दादा गायकवाड (सिंहगड रोड), विशेष शाखा, मदन बहाद्दरपुरे (कोरेगाव पार्क) विशेष शाखा, किशोर नावंदे (फरासखाना) वाहतूक शाखा, सत्यवान पाटील (चंदननगर) वारजे माळवाडी, अनिल पाटील (कोंढवा) विशेष शाखा, जगन्नाथ कळसकर (वाहतूक) फरासखाना, वसंत कुंवर (विशेष शाखा) भारती विद्यापीठ, दादासाहेब चुडाप्पा (विश्रामबाग) विश्रामबाग, प्रमोद पत्की (वाहतूक शाखा) कोरेगाव पार्क, शंकर खटके (कोथरुड) चंदननगर, मुरलीधर करपे (बिबवेवाडी) कोंढवा, कुमार घाडगे (मार्केटयार्ड) बिबवेवाडी, भास्कर जाधव (चतु:श्रृंगी) नियंत्रण कक्ष, अनिल शेवाळे (सहकारनगर) चतु:श्रृंगी, ब्रम्हानंद नाईकवडी (वाहतूक) स्वारगेट, नंदकुमार बिडवई (वारजे माळवाडी) सहकारनगर. पोलीस निरीक्षकांनी नवीन नेमणूकीचे ठिकाणी त्वरीत हजर होऊन कार्यभार धारण करावा असे आदेशात म्हटले आहे