जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – 63 व्या पोलीस स्थापना दिनाला (Police Foundation Day) पोलीस कॉन्स्टेबल विनोद अहिरे Police Constable Vinod Ahire (वय-44) यांनी 63 किलोमीटर स्केटिंग (Skating) करून विक्रम केला आहे. अहिरे यांनी हा विक्रम 26/11 चा हल्ला व कोरोना महामारीत शहीद झालेल्या शहिदांना अर्पण केला आहे. 2 जानेवारीला महाराष्ट्र पोलीस दलाला (Maharashtra Police) 63 वर्षे पूर्ण झाली. 2 जानेवारीपासून महाराष्ट्र पोलीस दल (Maharashtra Police) पोलीस सप्ताह म्हणून साजरा करीत आहे.
जळगाव जिल्हा पोलीस (Jalgaon District Police) दलातील राष्ट्रीय खेळाडू विनोद अहिरे यांनी पोलीस मुख्यालयातील रोड ट्रॅकवर सलग 63 किलोमीटर स्केटिंग करून पोलीस स्थापना दिन साजरा केला आहे. अशा अनोख्या पद्धतीने पोलीस स्थापना दिन साजरा करणारे ते महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिले पोलीस ठरले आहेत. हे 63 किलोमीटरचे अंतर त्यांनी दोन तास 26 मिनिटात पूर्ण केले. सकाळी साडेआठ वाजता अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी (Addl SP Chandrakant Gawli), एनसीसीचे लेफ्टनंट कर्नल पवन कुमार (Pawan Kumar) यांनी हिरवा झेंडा दाखवला. (Maharashtra Police)
तत्पूर्वी चंद्रकांत गवळी आपल्या मनोगत म्हणाले की, विनोद अहिरे हे खेळाडू तर आहेतच पण त्याचबरोबर खाकी वर्दीतील साहित्यिक, कवी, लेखक आहेत. त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. जळगाव जिल्हा पोलीस दलाला त्यांचा अभिमान आहे.
कर्नल पवन कुमार आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, माझ्या आता पर्यंतच्या सेवेमध्ये खेळाडू, साहित्यिक, कवी लेखक असा पोलीस मी प्रथमच बघत आहे, विनोद अहिरे हे जळगाव जिल्हा पोलीस दलाची शान आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उप अधीक्षक डेरे, प्रमोद बराटे, पोलीस निरीक्षक धनवट, संतोष सोनवणे,
लेफ्टनंट शिवराज पाटील, आरएसआय पवार, सहायक पोलीस निरीक्षक किरण पाठक,
जळगाव जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड. दिलीप बोरसे, फारुक शेख, एन एम कॉलेजचे एनसीसी चे
विद्यार्थी यासह जळगाव जिल्हा पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयाज मोसिन यांनी केले, गायक प्रकाश बोरसे यांच्या टीमने मोटिवेशनल गाणे गाऊन कार्यक्रमाचे रंगत वाढवली.
पायलटिंग पलाश शिंदे, बजरंग सपकाळे यांनी केली तर कार्यक्रम यशस्वीते साठी दिगंबर महाजन,
ज्ञानेश्वर पवार, प्रमोद अहिरे, प्रफुल्ल अहिरे यांनी परिश्रम घेतले.
Web Title :- Maharashtra Police | Police constable Vinod Ahire’s record by skating 63 kilometers consecutively
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Ajit Pawar | अजित पवार यांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा; म्हणाले…