Maharashtra Police | राज्यातील सुमारे 200 पोलिस निरीक्षकांचं ‘प्रमोशन’ लवकरच ! PI, उपनिरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या 5 ऑगस्टपर्यंत

(नितीन पाटील) –

Maharashtra Police | राज्य पोलिस दलातील (Maharashtra Police) पोलिस निरीक्षक तसेच पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या दि. 5 ऑगस्ट पर्यंत होणार आहेत. त्याबाबतचे संकेत पोलिस महासंचालक संजय पांडे (director general of police sanjay pandey) यांनी दिले आहेत. सर्वांना विनंतीनुसारच पोस्टिंग देण्यात आले असून काही ठिकाणचे अपवाद वगळता (व्हॅकन्सी नसल्यामुळे) सर्वांनाच चॉईस पोस्टिंग देण्यात आले आहे. दरम्यान, सुमारे 200 पोलिस निरीक्षकांना सहाय्यक आयुक्तपदी बढती लवकरच मिळणार असून त्यासाठी 3 ऑगस्ट रोजी बैठक आहे. पदोन्नतीच्या वेळी संबंधित अधिकार्‍यांची समवर्गप्रमाणे बदली होणार आहे.

पोलिस उपनिरीक्षक(Police Sub Inspector), सहाय्यक पोलिस निरीक्षक (assistant police inspector), पोलिस निरीक्षक (police inspector), सहाय्यक पोलिस आयुक्त (assistant commissioner of police) आणि इतर काही दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या होणार आहेत. त्याबाबत स्वतः पोलीस महासंचालकांनी फेसबुकपेजवरून संकेत दिले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासुन असंख्य पोलिस निरीक्षक बढतीच्या प्रतिक्षेत होते. आता मात्र त्यामधील सुमारे 200 पोलिस निरीक्षकांना सहाय्यक आयुक्त (पोलिस उपाधिक्षक) पदी बढती मिळणार असल्याचे निश्चीत झाले आहे. काही सहाय्यक पोलिस निरीक्षकांना पोलिस निरीक्षकपदी देखील बढती मिळणार आहे. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक ते पोलिस निरीक्षक यांची दि. 5 ऑगस्ट रोजीपर्यंत सर्वसाधारण बदली होणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे. सुमारे 200 पोलिस निरीक्षकांना सहाय्यक आयुक्तपदी बढती मिळणार असल्याने अनेक ठिकाणचे अधिकारी बदलले जाणार आहेत.

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील नांदेड सिटीमध्ये नॅशनल हॉर्स रायडर असलेल्या 17 वर्षीय श्रीया पुरंदरेची आत्महत्या, प्रचंड खळबळ

Nagpur News | नागपुर संघ मुख्यालयाजवळ भाजप-काँग्रेस कार्यकर्ते आपापसात भिडले

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Maharashtra Police | Promotion of about 200 police inspectors in the state soon! General Transfers of Sub-Inspectors and police inspectors till 5th August

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update