एल्गार परिषद प्रकरण : पुणे पोलिसांचा रांचीत फादर स्टेन स्वामींच्या घरावर छापा

रांची : वृत्तसंस्था – पुण्यातील एल्गार परिषद प्रकरणी  देशभरातील डाव्या विचारवंतांना अटक केल्यानंतर आता महाराष्ट्र पोलिसांनी रांची येथे फादर स्टेन स्वामींच्या घरावर छापा मारला आहे. त्यांच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि इतर साहित्या यावेळी पोलिसांनी जप्त केले आहे.  याआधीदेखील पुणे पोलिसांनी त्यांच्या घरावर २९ ऑगस्ट रोजी छापा मारला होता. मात्र त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केली नव्हती.

३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवार वाड्याच्या प्रांगणात झालेल्या  एल्गार परिषदेप्रकरणी पुणे पोलिसांनी देशभरातील पाच विचारवंतांना माओवादी कनेक्शनवरून अटक केली आहे. या पाच विचारवंतांवर पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते सध्या पुण्यातील कारागृहात आहेत. त्यांना अटक केली तेव्हाही पुणे पोलिसानी फादर स्टेन स्वामी यांच्या घरावर छापा टाकला होता.


कोण आहेत फादर स्टेन स्वामी ?
फादर स्टेन स्वामी हे मुळचे केरळचे आहेत. गेल्या ५० वर्षांपासून ते झारखंडमध्ये राहत आहेत. झारखंडची निर्मिती २००४ मध्ये झाल्यानंतर ते रांचीला गेले. त्यांनी झारखंडमधील नामकुंम बगेईचा या आदीवासी समाजाच्या अधिकारासाठी काम करणाऱ्या संघटनेत काम केले आहे.

नक्षलवादाचा ठपका ठेवून कारागृहात टाकलेल्या आदीवासींसाठी काम
फादर स्टेन स्वामी यांची ओळख एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आहे. ते सध्या आदीवासी कैद्यांसाठी काम करत आहेत. त्यांच्या समर्थकांच्या म्हणण्यांनुसार फादर स्टेन स्वामी नक्षलवादाचा ठपका ठेवून कारागृहात टाकलेल्या आदीवासींसाठी काम करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

विद्यार्थ्यांचा शोध, आंब्याच्या पानांपासून तयार केले मद्य

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!

पुण्यातील डॉक्टर झटतेय काश्मीरमधील नागरिकांच्या आरोग्यासाठी

ई-फार्मसीसाठी ई-प्रिस्क्रिप्शनची गरज