Maharashtra Police Recruitment | राज्य सरकारची मोठी घोषणा, पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र सरकारने नुकतीच पोलीस भरतीची घोषणा (Maharashtra Police Recruitment) केली होती. या घोषणेनुसार, तब्बल 18,000 पेक्षा अधिक पोलिसांची (Maharashtra Police Recruitment) भरती होणार आहे. त्यामुळे अनेक तरुणांना पोलीस होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. त्यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार, 9 नोव्हेंबर 2022 पासून यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

 

मात्र, संबंधित संकेतस्थळ (वेबसाईट) वारंवार हँग होत असल्याने इच्छुकांना अर्ज भरताना अनेक अडचणी येत होत्या. राज्यातील काही ठिकाणी अर्ज भरण्यासाठी बराच वेळ लागत होता. त्यामुळे, अनेक विद्यार्थ्यांची अद्याप नोंदणी झालेली नसून काही विद्यार्थ्यांची पेमेंट प्रक्रिया देखील रखडली असल्याची तक्रार करण्यात येत होती. हे सर्व गोष्टी लक्ष्यात घेऊन, महाराष्ट्र सरकारने आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 15 दिवसांची मुदत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती दिली.
मागील काही दिवसांपासून पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी मुदत वाढवण्यासाठीची मागणी करण्यात येत होती.
पोलीस भरतीसाठी इच्छुक असणाऱ्यांना आता 15 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज भरता येणार आहे.
त्यामुळे पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार आजपर्यंत पोलीस भरतीसाठी 11 लाख 80 लाख अर्ज आले आहेत.

 

Web Title :- Maharashtra Police Recruitment | maharashtra cabinet approval to extension 15 days for apply for maharashtra police recruitment says deputy chief minister devendra fadnavis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Sanjay Raut | सीमावादावरुन संजय राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले – ‘त्या लोकांना घालवण्यासाठी पुन्हा…’

MNS Chief Raj Thackeray | आम्ही फक्त प्रश्न सोडवायला असतो, आम्हाला कोणी मते देत नाही – राज ठाकरे

Anupam Kher | काश्मीर फाइल्सवर झालेल्या टीकेनंतर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्वीट करत दिले ‘हे’ प्रतिउत्तर