Maharashtra Police Recruitment | अखेर पोलीस भरतीचा मार्ग मोकळा, कमाल वयोमर्यादेत शिथिलता; ‘या’ उमेदवारांना होणार फायदा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारकडून (State Government) काही दिवसांपूर्वी पोलीस भरती (Maharashtra Police Recruitment) जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यानंतर लगेच काही तांत्रिक मुद्दा समोर आल्याने पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली होती. परंतु नक्की कशामुळे ही भरती थांबवण्यात आली यासंदर्भात कोणतीही स्पष्टता नव्हती. मात्र आता हा तांत्रिक मुद्दा दूर झाला असून राज्यात पोलीस भरतीचा (Maharashtra Police Recruitment) मार्ग मोकळा झाला आहे.
यंदाच्या पोलीस भरतीमध्ये (Maharashtra Police Recruitment) हजारो रिक्त पदे भरली जाणार होती. मात्र कोरोना (Corona) काळात ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीचा अर्ज भरला आहे अशा उमेदवारांना या भरतीत जागा मिळेल का यावर प्रश्नचिन्ह होते. अशा उमेदवारांनी सरकारकडे दाद मागितली होती. त्यामुळे आता सरकारने आणि गृहविभागाने मोठा निर्णय घेतला आहे. या उमेदवारांना पोलीस भरतीची संधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे अनेक उमेदवारांना याचा फायदा होणार आहे.
कोरोना काळात अर्ज केलेल्या उमेदवारांची वयोमर्यादा समाप्त झाली होती. त्यामुळे ते परीक्षेला (Exam) बसण्यास पात्र नव्हते. आता अशा उमेदवारांना वयोमर्यादेत शिथिलता आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे कोरोना काळात अर्ज केलेल्या आणि ज्यांची वयोमर्यादा समाप्त झाली आहे, अशा उमेदवारांना आता पोलीस भरतीसाठी संधी मिळणार आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती जागा ?
मुंबई – 6740, ठाणे शहर – 521, पुणे शहर – 720, पिंपरी चिंचवड – 216, मिरा भाईंदर – 986, नागपूर शहर – 308,
नवी मुंबई – 204, अमरावती शहर – 20, सोलापूर शहर- 98, लोहमार्ग मुंबई – 620, ठाणे ग्रामीण – 68,
रायगड -272, पालघर – 211, सिंधूदुर्ग – 99, रत्नागिरी – 131, नाशिक ग्रामीण – 454, अहमदनगर – 129,
धुळे – 42, कोल्हापूर – 24, पुणे ग्रामीण – 579, सातारा – 145, सोलापूर ग्रामीण – 26, औरंगाबाद ग्रामीण- 39,
नांदेड – 155, परभणी – 75, हिंगोली – 21, नागपूर ग्रामीण – 132, भंडारा – 61, चंद्रपूर – 194, वर्धा – 90,
गडचिरोली – 348, गोंदिया – 172, अमरावती ग्रामीण – 156, अकोला – 327, बुलढाणा – 51, यवतमाळ – 244, लोहमार्ग पुणे – 124, लोहमार्ग औरंगाबाद -154, एकूण – 14956
कोणत्या प्रवर्गाला किती जागा?
अनुसूचित जाती – 1811, अनुसूचित जमाती – 1350, विमुक्त जाती (अ) -426, भटक्या जमाती (ब) -374,
भटक्या जमाती (क) – 473, भटक्या जमाती (ड) -292, विमुक्त मागास प्रवर्ग – 292, इतर मागास वर्ग -2926, EWS- 1544, खुला – 5468
Web Title :- Maharashtra Police Recruitment | maharashtra police bharti 2022 big decision of age limit relaxation for candidates
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update