Maharashtra Police Recruitment | राज्य सरकारचा मोठा निर्णय, लवकरच 20 हजार पोलिसांची भरती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police Recruitment | राज्यात लवकरच 20 हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Government) घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. येत्या दोन वर्षात राज्यात मोठ्या प्रमाणात पोलीस भरती (Maharashtra Police Recruitment) करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच सायबर सेक्युरिटी (Cyber Security), तुरुंगातील कैद्यांची अवस्था यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाष्य केलं.

 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 8 हजारांची एक जाहिरात आधीच निघाली आहे. आता 12 हजारांची जाहिरात लवकर काढू. या भारतीमुळे पोलीस विभागावरील (Maharashtra Police Recruitment) मोठा ताण कमी होईल असे ते म्हणाले. तसेच यावेळी गुजरातमध्ये गेलेल्या वेदांता प्रकल्पावरुन विरोधकांना टोला लगावला.

 

यावेळी बोलताना फडणवीस यांनी तुरुंगातील कैद्याबाबत महत्वाची माहिती दिली.
ते म्हणाले, तुरुंग विभागात (Jail Department) सुधारणा करण्याची गरज आहे. सध्या तुरुंगात 1641 असे कैदी आहेत, ज्यांची बेल झाली आहे, पण बेलबाँड करण्यासाठी त्यांच्याकडे व्यक्ती किंवा पैसे नसल्यामुळे ते तुरुंगातच आहेत. अशा कैद्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही काही एनजीओची मदत घेणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

 

 

राज्यात अनेक सायबर गुन्हे (Cyber Crime) घडत आहेत. फिशींगच्या माध्यमातून लोकांना लुटले जात आहे.
त्यांना त्रास दिला जात आहे. यासाठी सरकार योग्य ती कारवाई करत असून,
लवकरच राज्यात सायबर सेक्युरीटीचे रोबस्ट इन्फ्रस्ट्रक्चर (Robust Infrastructure of Cyber Security) उभारणार आहोत.
तसेच जागरुकतेसाठी एक कँपनेदेखील हाती घेत असल्याचे फडणवीस म्हणाले.

 

 

Web Title :- Maharashtra Police Recruitment | shinde fadanvis government recruitment of 20 thousand police soon informed by deputy chief minister devendra fadanvis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | किरकोळ वादातून रिक्षा चालक तरुणाचा निर्घृण खून, हडपसर परिसरातील घटना

Pune News | अतिवृष्टी नुकसानीपोटी 3 कोटी 18 लाखांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त

Popular Front of India (PFI) | PFI च्या रडारवर कोण कोण होतं? महाराष्ट्र ATS कडून खुलासा