महाराष्ट्र पोलीस दलात लवकरच 7 ते 8 हजार पदांसाठी ‘मेगा’भरती, गृहमंत्र्यांनी दिले ‘संकेत’

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – देशात शेतकरी आत्महत्येपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्येचे प्रमाण जास्त असल्याचे नॅशनल क्राइम रेकोर्ड्स ब्युरोच्या अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने तरुणांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर गृह खात्याने लवकरच मेगा भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यात येणार असून लवकरच 7 ते 8 हजार पोलिसांची भरती होईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

गृहमंत्री अनिल देशमुख हे श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्यात मेगा भरती होईल असे सांगितले. रिक्त जागांवर भरती झाल्यास राज्यातील पोलिसांवरील ताण कमी होईल असे म्हटलं जात आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार पावले उचलणार आहे. अवैध सावकारी, नक्षलवादाला आळा घालण्यासाठी उपाययोजना आखण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तरुणांनी अभ्यासात सातत्य ठेवायला पाहिजे. पोलीस भरतीसह स्पर्धा परीक्षेत ग्रामीण भागातील तरुणांनीही उतरावं असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. त्याबद्दल बोलताना देशमुख म्हणाले, पालकांनी मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नये. अभ्यास करताना पाठांतर, घोकंपट्टीवर जोर देऊ नका. त्याऐवजी बौद्धीक वाढ होते की नाही याकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे असेही देशमुख यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like