Maharashtra Police Recruitment | SRPF गट क्र.५ दौंड येथील सशस्त्र पोलीस भरती ! लेखी परीक्षेकरीता पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध; आक्षेप नोंदवण्यास ३१ जानेवारीपर्यंतची मुदत

0
379
Maharashtra Police Recruitment | SRPF Group No.5 Daund Armed Police Recruitment ! Released list of eligible candidates for written test; Deadline for filing objections is 31st January
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police Recruitment | राज्य राखीव पोलीस बल गट क्र.५, दौंड या गटाच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीच्या लेखी परीक्षेकरीता (SRPF Bharti 2022 – 2023) प्रवर्गनिहाय निवड झालेल्या उमेदवारांची यादी https://www.maharashtrasrpf.gov.in संकेतस्थळावर २७ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. (Maharashtra Police Recruitment)

 

रिक्त असलेल्या ७१ पदांकरीता मैदानी चाचणीत उमेदवारांना मिळालेल्या गुणाच्याआधारे १:१० या प्रमाणात ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांना याबाबत काही हरकती किंवा आक्षेप असल्यास कार्यालयाच्या [email protected] ई-मेल आयडीवर लेखी स्वरुपात किंवा समादेशक कार्यालयातील नियंत्रण कक्ष येथे प्रत्यक्षरित्या हजर राहून ३१ जानेवारी २०२३ रोजी ५ वाजेपर्यंत सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्या हरकती किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. (Maharashtra Police Recruitment)

 

अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या ०२११७-२६२३४७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५ दौंडच्या समादेशक विनीता साहू यांनी दिली आहे. (Maharashtra Police News)

 

Web Title :- Maharashtra Police Recruitment | SRPF Group No.5 Daund Armed Police Recruitment ! Released list of eligible candidates for written test; Deadline for filing objections is 31st January

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | वरळीत आदित्य ठाकरेंना मोठा धक्का, माजी नगरसेवकाचा शिंदे गटात प्रवेश

Satyajit Tambe | ‘मी अपक्ष उमेदवार आहे, आणि अपक्षचं राहील..’ कुठलंही राजकीय भाष्य आजच्या तारखेला करणार नाही – सत्यजीत तांबे

Chitra Wagh | ‘मी कोणाचीच तुलना केली नाही’, ‘त्या’ वक्तव्यावरुन चित्रा वाघ यांची सारवासारव (व्हिडिओ)