Maharashtra Police-Revenue General Transfer | सार्वत्रिक बदल्यांचा हंगाम यंदा 30 जूनपर्यंत चालणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police-Revenue General Transfer | राज्यातील कोरोनाच्या (Corona in Maharashtra) प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षापासून रखडलेल्या सार्वत्रिक बदल्या (General Transfers) आणखी एक महिना लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. गुरुवारी (दि.26) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) सार्वत्रिक बदल्या (Maharashtra Govt General Transfer) आणखी एक महिना पुढे ढकलण्याची मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी केली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. थोरात यांनी केलेली मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मान्य केल्याचे समजतेय. यामुळे 31 मे अखेर संपणारा सार्वत्रिक बदल्यांचा हंगाम यंदा 30 जून पर्यंत चालणार असून याबाबत शासन निर्णय येत्या एक ते दोन दिवसांत निघेल असेही सांगितले जात आहे. (Maharashtra Police-Revenue General Transfer)

 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा (Maharashtra Local Body Elections 2022) कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी पुढील काही दिवसांत तो जाहिर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महसूल अधिकारी यांच्यासह इतर (पोलिस) खात्यातील महत्त्वाच्या पदावरील अधिकाऱ्यांच्या विचारपूर्वक बदल्या करता याव्यात यासाठी ही सूचना थोरात यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे. एप्रिल – मे हे बदल्यांचे महिने म्हणून ओळखले जातात. या काळात शासनाच्या विविध विभागातील हजारो बदल्या होत असतात.

एक ते चतुर्थ श्रेणीतील अशा हजारो बदल्या (Maharashtra Police-Revenue General Transfer) होतात.
यानंतर विनंती बदल्या केल्या जातात. कोरोना साथीमुळे मागील दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात बदल्या झालेल्या नाहीत.
यामुळे यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात बदल्या होणार आहेत.
सर्वसाधारण बदल्यांची फाईल 31 मे पर्यंत त्या त्या विभागाचे मंत्री यांच्यापर्यंत जाईल.
विनंती बदल्यांची फाईल मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत जाते. यामुळे नियमित बदल्यांचा कालावधी महिनाभर लांबवण्याची विनंती थोरात यांनी केली असून त्यांच्या या मागणीला इतर मंत्र्यांनी सहमती दर्शविली आहे.

 

Web Title :- Maharashtra Police-Revenue General Transfer | Maharashtra General Transfer Will Run Till June 30 This Year

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा