Maharashtra Police | पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबित; जाणून घ्या प्रकरण

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police | वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करुन कामकाजाची संपूर्ण माहिती न देता अर्धवट माहिती देऊन कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी सोलापूर पोलीस (Solapur Police) आयुक्तालयातील राखीव पोलीस निरीक्षक भगवान व्हि. टोणे (Reserve Police Inspector Bhagwan V. Tone) आणि राखीव पोलीस उपनिरीक्षक नागेश पवार (Reserve PSI Nagesh Pawar) यांना तडकाफडकी निलंबित (Suspended) करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश पोलीस आयुक्त हरीश बैजल (CP Harish Baijal) यांनी काढले आहेत. (Maharashtra Police)

 

सोलापूर पोलीस मुख्यालयातील (Solapur Police Headquarters) 367 पोलीस अमंलदारांना दैनंदिन कामाचे वाटप करताना काही जणांना महिनो-महिने शुल्लक प्रकारच्या ड्यट्या देणे, त्यांना झुकते माप देणे तसेच एकाच ठिकाणी नेमणूक करुन इतर अमंलदारांवर अन्याय केल्याचे आदेशात नमूद केले आहे. सहायक पोलीस आयुक्त प्रशासन (ACP Administration) यांनी भेट देवून आळी-पाळीने कर्तव्य नेमण्यास सांगितले होते. वरिष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करुन कामकाजाची माहिती पूर्ण न देता अर्धवट देऊन कामकाजात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत राखीव पोलीस निरीक्षक आणि राखीव पोलीस उपनिरीक्षक यांना पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी निलंबन केले. (Maharashtra Police)

 

पोलीस निरीक्षक भगवान व्हि. टोणे आणि राखीव पोलीस उपनिरीक्षक नागेश पवार यांनी महाराष्ट्र नागरी सेवा कायद्यातील (Maharashtra Civil Service Act) नियमांचे उल्लंघन (Violation of Rules) केले आहे. त्यामुळे सोलापूर पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाली आहे. निलंबन कालावधीत खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. तसेच निर्वाह भत्ता घेताना खासगी व्यवसाय व नोकरी करत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title :- Maharashtra Police | Solapur City Police Police Inspector And Police Sub Inspector Suspended Solapur CP IPS Harish Baijal


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

OBC Reservation Maharashtra | निवडणुकीपूर्वी आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू

MP Bhavana Gawali | शिवसेनेच्या खासदार भावना गवळी ED च्या चौकशीला पुन्हा गैरहजर

Post Office MIS Calculator | पोस्ट ऑफिसची दमदार स्कीम ! एकरक्कमी 2 लाख रु. करा जमा; 13200 रुपयांचे होईल गॅरेंटेड इन्कम, जाणून घ्या सविस्तर

Allahabad High Court On Azaan Loudspeakers | उच्च न्यायालयाने मशिदीवरील लाऊडस्पीकरबाबत दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय !

Pune Crime | मिलिंद एकबोटे, नंदकिशोर एकबोटे यांना अटकपूर्व जामीन मंजूर, पण…