Maharashtra Police | महिला कॉन्स्टेबलची पोलीस लाईनमध्ये आत्महत्या, पोलीस दलात खळबळ

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police | पोलीस मुख्यालयात (Kolhapur Police Headquarter) कार्यरत असणाऱ्या एका महिला कॉन्स्टेबलने (Lady Police Constables) गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केल्याची (Suicide In Kolhapur) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. योगिनी सुकुमार पवार Yogini Sukumar Pawar (वय – 36 रा. पोलीस लाईन कसबा बावडा Police Line Kasba Bawda) असे आत्महत्या केलेल्या महिला कॉन्स्टेबलचे नाव असून त्यांनी कौटुंबिक वादातून (Family Dispute) आत्महत्या केली. ही घटना आज (रविवार) दुपारी पोलीस लाईनमध्ये (Maharashtra Police) घडली.

 

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे (SP Shailesh Balkwade), शहर पोलीस उप अधीक्षक मंगेश चव्हाण (City Deputy SP Mangesh Chavan), शाहुपुरीचे राजेश गवळी (Rajesh Gawli) यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. आत्महत्या करण्यापूर्वी योगिनी पवार यांनी चिठ्ठी लिहून (Suicide Note) ठेवली आहे. पोलिसांनी चिठ्ठी ताब्यात घेतली आहे. पतीकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे.(Maharashtra Police)

 

कौटुंबिक वादातून महिला पोलीस कॉन्स्टेबल योगिनी पवार यांनी टोकाचे पाऊल उचलले.
त्यांच्या आत्महत्येमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याप्रकरणाची शाहूपुरी पोलीस ठाण्यात (Shahupuri Police Station) नोंद करण्यात आली आहे.

 

Web Title :- Maharashtra Police | suicide of a lady police constable in a police line in kolhapur

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा