Maharashtra Police | वाळू माफियांसोबतची मटण पार्टी पडली महागात, 3 पोलिस तडकाफडकी निलंबित

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police | वाळू माफियांसोबत (Sand Mafia) मटणाची पार्टी (Mutton party) करणं भंडारा पोलीस दलातील (Bhandara Police) तीन पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. वाळू माफियांसोबत मटणाची पार्टी करणाऱ्या तीन पोलीस शिपायांना तडकाफडकी निलंबित (Policemen Suspended) करण्यात आले आहे. दिलीप धावडे (Dilip Dhavade), खुशांत कोचे (Khushant Koche), राजेंद्र लांबट (Rajendra Lambat) असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस शिपायांची (Maharashtra Police) नावे आहेत. पोलिसांच्या निलंबनाचे आदेश पोलीस अधीक्षक वसंत जाधव (SP Vasant Jadhav) यांनी काढले आहेत.

 

भंडाऱ्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना (Sub-Divisional Officers) वाळू माफियांकडून मारहाण (Beating) करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक (Arrest) केली असून सहा आरोपी फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींसोबत मटणाची पार्टी करणाऱ्या तीन पोलीस शिपायांना निलंबित (Maharashtra Police) करण्यात आले आहे.

 

काय आहे प्रकरण?
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील (Pawani Taluka) बेटाडा गावामध्ये 27 एप्रिल रोजी वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी उप विभागीय अधिकाऱ्यांचे पथक गेले होते. त्यावेळी या पथकावर वाळू माफियांनी हल्ला करुन उप विभागीय अधिकारी रवींद्र राठोड (Ravindra Rathod) आणि पोलीस उपनिरीक्षक राऊत (PSI Raut) यांना जखमी केले होते. याप्रकरणी पवनी पोलीस ठाण्यात (Pawani Police Station) गुन्हा (FIR) दाखल करुन 9 पैकी तीन आरोपींना अटक केली आहे.

उप विभागीय अधिकारी यांच्या पथकावर हल्ला करणारे आरोपी नागपूर जिल्ह्यातील (Nagpur District)
उमरेड तालुक्यातील दि मर्शी हॉटेलमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक हॉटेलमध्ये पोहचले. त्यावेळी आरोपी मटणाची पार्टी करत होते.
आरोपींना अटक करण्यासाठी गेलेले पोलिसच आरोपींसोबत मटण पार्टीमध्ये सहभागी झाले. यावेळी पोलीस वर्दीवर (Uniform) होते.
वाळू माफियांसोबत मटण पार्टी करतानाचा पोलिसांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला.
त्यानंतर पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत पार्टीत सहभागी झालेल्या तीन पोलीस शिपायांना निलंबित केले.

 

Web Title :- Maharashtra Police | three policemen suspended for doing mutton party with sand mafia in bhandara

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jalgaon Crime | पोलीस निरीक्षक कीर्तनस्थळी बूट घालून, कार्यक्रम केला बंद; संतप्त वाकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

 

BJP MNS Alliance | मोठी बातमी ! भाजप-मनसे युतीची घोषणा ‘या’ तारखेला होण्याच्या शक्यतेची जोरदार चर्चा

 

MP Navneet Rana – MLA Ravi Rana | राणा दाम्पत्यानं केली न्यायालयास विनंती, म्हणाले – ‘आम्हाला घरचं जेवण द्या, खाण्याची आबळ होतेय’