Maharashtra Police Transfer | मर्जीतील अधिकाऱ्यांच्या नेमणूकीवरुन शिंदे-फडणवीसांमध्ये रस्सीखेच?, नाराजीनाट्यात अडकल्या पोलिसांच्या बदल्या?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (IPS Officers Transfer) झाल्या असल्या तरी महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांना (Maharashtra Police Transfer) अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या वरून एकमत झाले नसल्याने महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या (Maharashtra Police Transfer) रखडल्याचे समजते. निवडणूक प्रचार, शहरातील, तसेच जिल्ह्यातील महत्त्वाचे निर्णय पोलिसांच्या हातात असल्याने आपल्या मर्जीतील अधिकारी नेमण्यावरुन शिंदे-फडणवीस यांच्यामध्ये रस्सीखेच सुरु असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

शनिवारी रात्री महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यावरुन (Maharashtra Police Transfer) शिंदे-फडणवीस यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीत बदल्यांवरून बिनसल्यानंतर रविवारी या दोन्ही नेत्यांचे तीन कार्यक्रम होते. या कार्यक्रमांना दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर दिसणार होते. मात्र ते एकाही ठिकाणी एकत्र न आल्याने नेमकं काय गौडबंगाल आहे, याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

राज्यात प्रधान सचिव (Principal Secretary), जिल्हाधिकारी (Collector), पालिका आयुक्त
(Municipal Commissioner) यांच्यानंतर पोलीस दलाचा क्रमांक लागतो.
राज्यातील विविध शहरांमधील पोलीस आयुक्त (Commissioner of Police (CP) आणि जिल्ह्यामधील पोलीस अधीक्षक (Superintendent of Police (SP) पदावरील अधिकाऱ्यांना अधिक महत्व आहे. निवडणूक प्रचारामध्ये पोलिसांची भूमिका महत्त्वाची असते. प्रचारादरम्यान सभा, रॅली, पदफेऱ्या यासाठी पोलिसांची परवानगी लागते. तसेच निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून पक्षाच्या कार्यकर्त्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवून प्रचारावर नियंत्रण मिळवले जाते. त्यामुळे पोलिसांच्या बदल्यांमध्ये राजकारण्यांचे बरेच स्वारस्य असते.

दोन आठवड्यापूर्वी राज्यातील विविध खात्यांच्या सचिवांच्या, जिल्हाधिकारी तसेच पालिका आयुक्तांच्या बदल्या झाल्या. परंतु पोलिसांच्या बदल्यांचा प्रश्न अद्याप रखडलेला आहे.
शनिवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वर्षा निवासस्थानी बैठक झाल्याचे समजते.
यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या वरून चर्चा झाल्याचेही समजते.
परंतु दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले नाही.
एवढेच नाही तर बैठकीमधील या नाराजीनाट्यामुळे रविवारी या दोन्ही नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येण्याचे टाळले असल्याची चर्चा आहे.

Web Title :- Maharashtra Police Transfer | decision on the transfer of police officers is still pending

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Rain | पुणे बुडाले पावसात; पावसामुळे शहरात हाहाकार, अनेक घरात शिरले पाणी, रेल्वे स्टेशनही बुडाले

Ashish Shelar | ‘मशालीचा चटक बसला’ म्हणणाऱ्या ठाकरे गटाला आशिष शेलारांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘सामनाच्या अग्रलेखात सदैव अजरामर असलेला “गणपत वाणी” आज…’

Pune Rain | अग्निशामक दलाने केली 12 जणांची पावसात अडकलेल्या सुटका