Maharashtra Police Transfers – IG / DCP / SP | कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची बदली ! IG अशोक मोराळे यांची पुण्यात Transfer, 7 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police Transfers – IG / DCP / SP | राज्यातील विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपायुक्त, पोलीस अधीक्षक, पोलीस उप अधीक्षक दर्जाच्या 7 अधिकार्‍यांच्या बुधवारी (दि.24) सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या. विशेष पोलीस महानिरीक्षक अशोक मोराळे, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशाने शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट (Joint Secretary Venkatesh Bhat) यांनी बुधवारी याबाबचे आदेश काढले आहेत. (Maharashtra Police Transfers – IG / DCP / SP)

 

 

बदली झालेल्या अधिकारी नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे आहे.

1. अशोक मोराळे Ashok Morale (विशेष पोलीस महानिरीक्षक, रा.रा. पोलीस बल, नागपूर ते विशेष पोलीस महानिरीक्षक रा.रा. पोलीस बल, पुणे)
2. महेंद्र कलमलाकर पंडीत Mahendra Kallamakar Pandit (पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई (DCP Brihanmumbai) ते पोलीस अधीक्षक, कोल्हापूर (SP Kolhapur)
3. शैलेश बलकवडे Shailesh Balkawade (पोलीस अधीक्षक, कोल्हापूर ते समादेशक, रा. रा. पोलीस बल, गट क्र.1 पुणे)
4. योगेश कुमार गुप्ता Yogesh Kumar Gupta (पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई ते पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नांदेड)
5. मोनिका राऊत Monika Raut (अपर पोलीस अधीक्षक, अकोला (Addl SP Akola) ते पोलीस उपायुक्त, नाशिक शहर (DCP Nashik City)
6. अभय डोंगरे Abhay Dongre (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना ते अपर पोलीस अधीक्षक, अकोला)
7. गुलाबराव परशराम वाघ Gulabrao Parasharam Wagh (पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय बुलढाणा (DSP Buldhana) ते उप विभागीय पोलीस अधिकारी, बुलढाणा (Deputy Divisional Police Officer, Buldhana)

 

 

 

Web Title :  Kolhapur Superintendent of Police Shailesh Balkawade transferred, IG Ashok Morale and 7 senior officers transferred

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा