Maharashtra Police | धक्कादायक ! ‘चरस’च्या तस्करी प्रकरणी 2 पोलिस कर्मचारी गोत्यात

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police कल्याणमध्ये पोलीसच अंमली पदार्थांची तस्करी करत (Kalyan Dombivli Crime) असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अंमली पदार्थांची तस्करी करताना दोन पोलिसांना ठाणे नार्कोटीक्स विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. महेश वसेकर (Mahesh Vasekar) आणि रवी भिसे (Ravi Bhise) अशी या दोन पोलिसांची नावे आहेत. दोघेही कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात (Kalyan Railway Police Station) कार्यरत आहेत. त्यांच्याकडून 925 ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे. (Maharashtra Police)

कल्याणच्या दुर्गाडी चौकात दोन व्यक्ती येणार आहेत आणि ते कल्याणहून चरस घेऊन ठाण्याची दिशेने जाणार असल्याची माहिती ठाणे नार्कोटीक्स विभागाला मिळाली. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी विभागाच्या पोलीस पथकाचे अधिकारी संजय शिंदे (Sanjay Shinde) यांनी दुर्गाडी चौकात सापळा रचला. त्यानुसार दोन व्यक्ती दुचाकीवरुन त्या ठिकाणी आले. पोलिसांना त्यांची चौकशी आणि तपासणी केली. त्यांच्याकडून 925 ग्रॅम चरस हस्तगत केला. (Kalyan Crime) त्यांच्या अधिक तपासणीत ते दोघे पोलीस असल्याचे उघड झाले. या दोघांना ताब्यात घेत, बाजारपेठ पोलिसांच्या हवाली करण्यात आले. त्यांच्यावर बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे पोलीस अंमली पदार्थांच्या विरोधात मोठ्या कारवाया करत आहेत, तर दुसरीकडे पोलीसच या प्रकरणात गुन्हेगार असल्याने कारवाई पथक थक्क झाले. (Maharashtra Police)

यांनी हा चरस कुठून आणला, गेले किती दिवस ते हा अवैध व्यापार करत आहेत, आदी प्रश्न यावेळी उपस्थित झाले
आहेत.
नार्कोटीक्स विभाग त्यांची कसून चौकशी करत आहे.
ते चरस कोणाला विकतात, त्यांचा देखील पोलीस शोध घेत आहेत.
पोलीस प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी कसून तपास करत आहेत.

Web Title :-  Maharashtra Police | two policemen arrested for smuggling hashish in kalyan dombivli crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime | मटणाच्या सुपात भात आल्याने खानावळीतील वेटरचा खून; पिंपरी-चिंचवडमधील घटना

Ananya Pandey | अनन्या पांडे न्यूयॉर्कमध्ये करतेयं धमाल, शेअर केले फोटो

8th Pay Commission | आठव्या वेतन आयोगाची चर्चा; केंद्रीय कर्मचाऱ्यांची 44 टक्के पगार वाढीची मागणी